Kiran Mane : “…तर तू चार लाथा खायच्या”, पुष्करला चॅलेंज, मानेंची सणसणीत पोस्ट

भागवत हिरेकर

30 Jan 2024 (अपडेटेड: 30 Jan 2024, 08:35 AM)

पुष्कर जोगने बीएमसी कर्मचाऱ्यांविरोधात पोस्ट लिहिली होती. त्या पोस्टचा अभिनेता किरण मानेंनी समाचार घेतला. किरण मानेंनी पुष्कर खुलं आव्हान दिलं.

Kiran mane slaps pushkar jog, actor has post against bmc employees.

Kiran mane slaps pushkar jog, actor has post against bmc employees.

follow google news

Kiran Mane Pushkar Jog : “बीएमसी कर्मचारी बाईमाणूस नसत्या तर 2 लाथा नक्कीच मारल्या असत्या”, असे म्हणणाऱ्या अभिनेता पुष्कर जोगवर संताप व्यक्त होतोय. बृहन्मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुष्कर जोगवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीये. केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर जोगने माफी मागितली. पण, पुष्कर जोगच्या विधानावर आता ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेता किरण माने यांनी खुलं आव्हान दिलं. काय आहे हे प्रकरण समजून घ्या…

हे वाचलं का?

मराठा समाज मागास आहे, हे सिद्ध करण्यासाठी सरकारकडून सर्वेक्षण करण्यात आलं. यासाठी राज्यभरात कर्मचारी घरोघरी गेले, जे मराठा आहेत त्यांची माहिती संकलित केली. सर्वेक्षण सुरू असतानाच अभिनेता पुष्कर जोगने एक पोस्ट केली.

“महिला नसती तर लाथा घातल्या असत्या”

पुष्कर जोगने पोस्टमध्ये म्हटलेलं की, “बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर 2 लाथा नक्कीच मारल्या असत्या… कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार”, असे पुष्कर म्हणाला होता.

पुष्करची पोस्ट व्हायरल झाली. सोशल मीडियावर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. सर्वेक्षण करण्याचा निर्णय सरकारचा आहे. कर्मचाऱ्यांवर राग का? असा सवाल पुष्कर जोगला सोशल मीडियावर विचारला गेला.

पुष्कर जोगची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली. त्यामुळे हे प्रकरण आणखी वाढलं.

बीएमसी कर्मचाऱ्यांची मागितली माफी

पोस्टमुळे पुष्कर टीकेचा भडीमार झाला. त्यानंतर त्याने ‘मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो.”

“अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे दुखावले गेले असतील, तर पुन्हा एकदा दिलगिरी”, असा पुष्कर जोग म्हणाला.

‘…लै महागात पडेल, मापात रहा’; किरण मानेंची पोस्ट वाचा जशीच्या तशी

“आमच्या मनोरंजन क्षेत्रातल्या वर्चस्ववाद्यांना हल्ली उन्माद चढलाय. ‘आमचीच सत्ता’ हा पोकळ माज आलाय…” मी परवाच ‘अजब गजब’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोललो.”

“दुसर्‍याच दिवशी पुष्कर जोग नांवाच्या, सिनेमात वगैरे काम करणार्‍यानं विधान केलं, “जातगणना करायला आलेली बाई नसती तर मी दोन लाथा घातल्या असत्या.”

“अरे भावा, ते सरकारनं दिलेल्या आदेशामुळे तुझ्या घरी आलेले साधे कर्मचारी होते रे ते. त्यांना हौस नाही तुमचे उंबरठे झिजवायचे. तुला लाथाच घालायच्यात ना??? लै राग आलाय का तुला जात विचारल्याचा???”

“मी तुला चॅलेंज देतो, ज्याने हा जातगणनेचा आदेश सोडलाय, त्या नेत्याला लाथा घाल. चल. खुल्लं आव्हान आहे माझं. तू जर त्या जातगणनेचा आदेश देणार्‍या सत्ताधारी नेत्याला लाथा नाही घातल्यास तर तू त्या कर्मचार्‍याकडून चार लाथा खायच्या.”

“बोल. आहे दम तुझ्या पार्श्वभागात??? अरे या नेत्यांचे पाय चाटणारी जमात तुमची. आडनांव घेऊन डिंग्या मारतोयस? काय घंटा इतिहास आहे तुमच्या आडनांवाचा? असला तरी काय खुट्ट्याला बांधायचाय?? आपलं काम इमानेइतबारे करणार्‍या कर्मचार्‍यांवर कसला माज दाखवतो तू???”

किरण माने यांनी पुष्कर जोगला उत्तर देणारी लिहिलेली फेसबुक पोस्ट.

 

“हे कर्मचारी जर आपली नोकरी बाजूला ठेवुन तुझ्यासमोर आले ना, तर एका दणक्यात तुझं वाकडं शेपूट सरळ करतील. नाद करू नको गरीबांचा. बुद्धी जागेवर ठेवून बोलत जा.”

“मराठ्यांच्या आणि ओबीसींच्या लढ्यात तू तुझ्या द्वेषाची पोळी भाजून घेऊ नकोस. बहुजन शांत आहेत म्हणून मस्तीत विधानं करणं लै महागात पडेल. मापात रहा.”

– किरण माने.

    follow whatsapp