ADVERTISEMENT
अभिनेत्री माधुरी दीक्षित ही 90 च्या दशकातील ब्यूटी क्वीन होती. आजगी तिचे अनेक चाहते आहेत.
17 ऑक्टोबरला माधुरीच्या लग्नाला 22 वर्ष पूर्ण झाले आहेत.
याच निमित्ताने माधुरीचे पती श्रीराम नेने यांनी देखील आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पत्नी माधुरी दीक्षित हिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
माधुरी आणि श्रीराम यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांचं बॉन्डिंग देखील पाहायला मिळतंय
धक-धक गर्ल माधुरीने 17 ऑक्टोबर 1999 साली श्रीराम नेनेंशी लग्न केलं होतं.
श्रीराम नेने हे पेशाने डॉक्टर आहेत. ते अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे कार्डियोवस्कुलर सर्जन आहेत.
नेने दाम्पत्याला अरिन आणि रयान अशी मुलं आहेत.
ADVERTISEMENT