माधुरी दीक्षित: प्लॅनेटवर अवतरली ‘धकधक गर्ल’

मुंबई तक

• 02:45 PM • 31 Aug 2021

फुलांची सजावट… ढोल ताशांचा गजर… राजेशाही थाट… या सगळ्या पारंपरिक सोहळ्यात धकधक गर्लने दिमाखदार एंट्री घेतली. अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या हस्ते ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चं लोकार्पण सोहळा मुंबईत संपन्न झाला. माधुरी दीक्षितच्या सदाबहार हास्याने आजही जगभरातील चाहत्यांच्या हृदयाची धकधक वाढते. माधुरी दीक्षितच्या हस्ते ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चं ॲप लाँच करण्यात आलं. मागील काही महिन्यांपासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ प्रेक्षकांच्या […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

फुलांची सजावट… ढोल ताशांचा गजर… राजेशाही थाट… या सगळ्या पारंपरिक सोहळ्यात धकधक गर्लने दिमाखदार एंट्री घेतली.

अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या हस्ते ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चं लोकार्पण सोहळा मुंबईत संपन्न झाला.

माधुरी दीक्षितच्या सदाबहार हास्याने आजही जगभरातील चाहत्यांच्या हृदयाची धकधक वाढते.

माधुरी दीक्षितच्या हस्ते ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चं ॲप लाँच करण्यात आलं.

मागील काही महिन्यांपासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची जोरदार चर्चा होती.

या चर्चेला पूर्णविराम देत ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

माधुरी दीक्षितच्या हस्ते ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.

या वेळी ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘म’ या लोगोची पालखीतून मिरवणूकही काढण्यात आली.

आज बॉलिवूडमध्ये आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी माधुरी दीक्षित या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’शी जोडली गेली.

या भव्य कार्यक्रमाला ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख संस्थपक अक्षय बर्दापूरकर देखील उपस्थित होते.

‘प्लॅनेट मराठी’च्या परिवारातील आणि मराठी मनोरंजन विश्वातील अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित या देखील हजर होत्या.

‘प्लॅनेट मराठी’च्या परिवारातील आणि मराठी मनोरंजन विश्वातील अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित या देखील हजर होत्या.

सुरुवातीपासूनच ‘प्लॅनेट मराठी’सोबत अनेक नावाजलेल्या व्यक्ती जोडल्या गेल्या. त्यात आता आपल्या सर्वांची लाडकी माधुरी दीक्षितही सहभागी झाली आहे.

यापूर्वीच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांवर आपली मोहोर उमटवणारा ‘जून’ चित्रपट प्रदर्शित झाला होता.

‘हिंग पुस्तक तलवार’, ‘जॉबलेस’, ‘बाप बीप बाप’, आणि ‘परीस’ या वेगवेगळ्या धाटणीच्या वेबसिरीज आणि चित्रपटही पाहता येणार आहेत.

मनोरंजनाचा हा खजिना वेबसिरीज, वेबफिल्म्स आणि चित्रपटांपुरताच मर्यादित नाही.

हा कंटेन्ट सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी असून येत्या वर्षभरात तब्बल 24 वेबसिरीज प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहेत.

सध्या 40 मराठी चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार असून पुढील तीन महिन्यांत ही संख्या सुमारे तिपट्टीहून अधिक असेल.

वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मुलाखती टॉक शो या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहेत.

पारंपरिक संगीतापासून ते आधुनिक संगीतापर्यंत तब्बल २० सांगितिक मैफिलींचा आनंद संगीतप्रेमींना या प्लॅटफॉर्मवर घेता येणार आहे.

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ बरोबरच्या या नव्या प्रवासाबद्दल अभिनेत्री माधुरी दीक्षितने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘जगभरातील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी केवळ मराठी ॲपची निर्मिती करणे, हे अक्षय बर्दापूरकर आणि त्यांच्या टीमने उचललेले एक कौतुकास्पद पाऊल आहे.’

‘मराठी इंडस्ट्री यामुळे एका वेगळ्याच उंचीवर पोहोचणार आहे.’

‘मराठी फिचर फिल्म्स आणि आशयामध्ये खूपच क्षमता आहे, जी अजून जगभरातील प्रेक्षकांनी अनुभवलेली नाही.’

‘या व्यासपीठामुळे चित्रपट निर्मात्यांना शोधणे आणि त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीस्कर होणार आहे.’

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ने प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा जो खजिना आणला आहे, तो खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे.’

‘या दर्जेदार कंटेन्टला तोड नाही. हा माझा सन्मान आहे, की या सोहळ्याला मला आमंत्रित करण्यात आले.’

माधुरी दीक्षितने तब्बल तीन दशकांहून अधिक काळ बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले आहे.

    follow whatsapp