महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाईंचा जीवनप्रवास रूपेरी पडद्यावर

मुंबई तक

• 02:27 PM • 10 Mar 2021

भारतातील मुलींसाठी शिक्षणाची दारं उघडी करून देणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी. या दिवसाच्या निमित्ताने दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून समीर विध्वंस यांनी क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरील सिनेमाची घोषणा केली आहे. महात्मा असं या सिनेमाचं नाव असणार आहे. या सिनेमाच्या माध्यामातून महात्मा […]

Mumbaitak
follow google news

भारतातील मुलींसाठी शिक्षणाची दारं उघडी करून देणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी. या दिवसाच्या निमित्ताने दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून समीर विध्वंस यांनी क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरील सिनेमाची घोषणा केली आहे.

हे वाचलं का?

महात्मा असं या सिनेमाचं नाव असणार आहे. या सिनेमाच्या माध्यामातून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा प्रवास रूपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. महात्मा ज्योबिता फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे.

समीर यांनी महात्मा या सिनेमाचा टीझर देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये “विद्येविना मती गेली…मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली…गतीविना वित्त गेले…वित्ताविना शूद्र खचले… इतके अनर्थ एका अविद्येने केले… ही महात्मा ज्योतिराव फुले यांची वाक्य लिहिलेली आहेत.

या टीझरला कॅप्शन देताना समीर लिहीतात, “क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांचे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही. सावीत्रीबाईंच्या स्मृतीस वंदन करून…सांगू पाहतोय..” तर सिनेमाला अजय आणि अतुलतं संगीत असणार आहे.

    follow whatsapp