ADVERTISEMENT
अभिनेत्री प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात आपल्या खास अँकरिंग शैलीमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली आहे.
आजपासून महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार असा पाच दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे प्राजक्ताच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट मानली जात आहे.
सोशल मीडियावर लाखोंच्या घरात चाहते असलेल्या प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही खास फोटोग्राफ शेअर केले आहेत.
प्राजक्ताच्या प्रत्येक फोटोंवर सोशल मीडियावर चाहते भरभरुन कमेंट करत असतात.
पारंपरिक असो किंवा वेस्टर्न प्रत्येक रुपात प्राजक्ताचं सौंदर्य अधिक खुलून येतं.
तिच्या या विविध रुपातील अदांवर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
प्राजक्ताचे काही महिन्यांपूर्वीच तीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेले.
पांडू, पावनखिंड आणि लकडाऊन या तीन सिनेमांत प्राजक्ता झळकली.
विशेषकरुन पावनखिंड आणि लकडाऊन सिनेमातल्या प्राजक्ताच्या लुकची चांगलीच चर्चा रंगली होती.
काय मग, तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT