ADVERTISEMENT
(फोटो सौजन्य: AP)हरनाज कौर संधू हिने मिस युनिव्हर्स 2021 चा किताब पटकावला आहे.
21 वर्षीय हरनाज संधू हिचा जन्म शिख कुटुंबात झाला आहे.
2017 साली हरनाजने मिस चंदिगडचा किताब पटकावला होता. त्यानंतर 2019 साली ती फेमिना मिस इंडियामध्ये देखील सहभागी झाली होती.
दरम्यान, मिस युनिव्हर्स स्पर्धेत हरनाजने पहिला क्रमांक पटकावला तर मिस पराग्वे दुसऱ्या नंबरवर आणि मिस साऊथ अफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर होते.
हरनाज कौर याआधी काही पंजाबी सिनेमांमध्ये देखील झळकली आहे.
हरनाजचं संपूर्ण कुटुंब हे मोहालीमध्ये राहतं. 2018 साली हरनाजला मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया 2018 किताबाने सन्मानित करण्यात आलं होतं.
याच वर्षी सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया 2021 चा किताबही पटकावला होता.
तब्बल 21 वर्षानंतर हरनाजने भारताला मिस युनिव्हर्सचा किताब मिळवून दिला आहे.
दरम्यान, आपण आपल्या कुटुंबीयांमुळेच आजवर इथपर्यंत पोहचू शकलो अशा भावना हरनाजने व्यक्त केल्या आहेत.
यावेळी तिने सगळ्यांचे आवर्जून आभार मानले आहेत.
अतिशय अनपेक्षितरित्या आणि सर्व स्पर्धकांना हुलकावणी देत हरनाजने हा मानाचा किताब मिळवला आहे.
हरनाजच्या आधी 1994 साली सुष्मिता सेन आणि 2000 साली लारा दत्ता यांनी हा किताब पटकावला होता.
ADVERTISEMENT