शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे पहिले गाणे रिलीज होताच वादात सापडले आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाच्या केशरी रंगाच्या बिकिनीला विरोध केला जात आहे. भगवा रंग हे श्रद्धेचे प्रतीक असल्याचे अनेक संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे या रंगाची बिकिनी घालून ‘बेशरम रंग’वर नाचणे योग्य नाही. शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पठाण’ गाण्यावरून निर्माण झालेल्या वादावर आता मुकेश खन्ना यांनी आपलं मत मांडलं आहे.
ADVERTISEMENT
बेशरम रंग गाण्यावरून भडकले मुकेश खन्ना
पायल रोहतगी आणि शर्लिन चोप्रा यांच्यानंतर मुकेश खन्नाही बेशरम रंग गाण्यावर बोलताना दिसत आहेत. मुकेश खन्ना यांनी शाहरुख आणि दीपिकाच्या चित्रपटातील गाणे अश्लील असल्याचे म्हटले आहे. एबीपीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘आजची मुलं टीव्ही आणि चित्रपट बघत मोठी होत आहेत. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने अशी गाणी पास करू नयेत. सेन्सॉर बोर्डावर प्रश्न उपस्थित करत मुकेश खन्ना म्हणाले की, ‘ते सर्वोच्च न्यायालय नाही, ज्याला विरोध करू नये’.
‘युवकांमध्ये चुकीचा मेसेज जात आहे’ : मुकेश खन्ना
मुकेश खन्ना यांनी बेशरम रंग या गाण्याला अश्लील म्हटले आहे. ते म्हणले, ‘आपला देश स्पेन झाला नाही, जो अशी गाणी आणू शकेल. सध्या अर्ध्या कपड्यांमध्ये गाणी रचली जात आहेत. काही काळानंतर कपड्यांशिवाय गाणी तयार होतील. मुकेश खन्ना म्हणतात की ‘सेन्सॉर बोर्ड असे गाणे का पास करते’ हे समजत नाही.
मुकेश खन्ना पुढे बोलताना म्हणाले की, ‘निर्मात्याला माहित नाही की भगवा रंग धर्म आणि समुदायासाठी खूप महत्त्वाचा आहे. अत्यंत संवेदनशील आहे, ज्याला आपण भगवा म्हणतो, जो शिवसेनेच्या झेंड्यातही आहे. तो आपल्या आरएसएसमध्येही आहे. जर त्यांना हे माहित असेल, तर काय विचार करुन गाणं बनवलं आहे. मुकेश खन्ना म्हणतात की, अमेरिकेत तुम्ही त्यांची ध्वज बिकिनी देखील घालू शकता. पण भारतात तसे करण्यास परवानगी नाही.
मुलाखतीत जेव्हा मुकेश खन्ना यांना विचारण्यात आले की, अनेक हिरोईनने यापूर्वीही भगव्या रंगाचे कपडे परिधान करून गाणी शूट केली आहेत, तर मग आक्षेप का नव्हता? याबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘आधी अशी बिकिनी बनवली आणि घातली गेली नाही. आता सोशल मीडिया आहे. लोक आवाज उठवू शकतात. मुकेश खन्ना म्हणाले की, भगवा रंग हा आरएसएस, शिवसेनेचाही आहे आणि भगव्या रंगाशी संबंधित त्यांची स्वतःची समजूत आहे आणि अशा स्थितीत हे गाणे मुद्दाम या रंगाच्या कपड्यांमध्ये ठेवण्यात आले आहे, जे चुकीचं आहे, असं ते म्हणाले.
ADVERTISEMENT