Naseeruddin Shah Hospitalised:ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शहा यांना या कारणामुळे उपचारासाठी केलं हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई तक

• 07:49 AM • 30 Jun 2021

ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शहा यांना न्यूमोनिया झाल्यामुळे तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. २९ तारखेला नसीरूद्दीन शहा यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील हिंदूजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले .सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची पत्नी आणि अभिनेत्री रत्ना पाठक शहा आणि त्यांची दोन मुलंही त्यांच्यासोबत आत्ता हॉस्पिटलमध्ये उपस्थित आहेत. नसीरूद्दीन शहा ७० […]

Mumbaitak
follow google news

ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शहा यांना न्यूमोनिया झाल्यामुळे तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. २९ तारखेला नसीरूद्दीन शहा यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील हिंदूजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले .सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची पत्नी आणि अभिनेत्री रत्ना पाठक शहा आणि त्यांची दोन मुलंही त्यांच्यासोबत आत्ता हॉस्पिटलमध्ये उपस्थित आहेत. नसीरूद्दीन शहा ७० वर्षांचे आहेत.त्यांच्या मँनेजरने दिलेल्या माहितीनुसार २९ तारखेला अभिनेते नसिरूद्दीन शहांना हिंदूजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्या फुफुस्सांमध्ये त्रास जाणवू लागल्याने आणि न्यूमोनियाचं प्रमाण वाढल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या नसिरूद्दीन शहा यांची तब्येत ठीक आहे. आणि २ दिवसात त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्जही मिळेल अशी माहिती त्यांच्या मँनेजरने माध्यमांना दिली

हे वाचलं का?
    follow whatsapp