खासदार डॉ. अमोल कोल्हेंना दुखापत, घोड्यावरून एन्ट्री घेताना काय घडलं?

मुंबई तक

01 May 2023 (अपडेटेड: 01 May 2023, 04:44 AM)

Amol Kohle Injured : शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे (Amol Kohle)  यांना दुखापत झाल्याची दुदैवी घटना घडलीय. ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा कराडमधील प्रयोगा दरम्यान ही घटना घटना घडली.

ncp mp amol kohle injured

ncp mp amol kohle injured

follow google news

Amol Kohle Injured : स्मिता शिंदे,पुणे : शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे (Amol Kohle)  यांना दुखापत झाल्याची दुदैवी घटना घडलीय. ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा कराडमधील प्रयोगा दरम्यान ही घटना घटना घडलीय. त्यामुळे महाराष्ट्राचा स्थापना दिन असल्याने आज 1 मे रोजीचा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा कराडमधील प्रयोग होणार असून उर्वरित दोन्ही प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. यामुळे फॅन्सना मोठा धक्का बसला आहे. (ncp mp amol kohle injured while taking entry from horse)

हे वाचलं का?

कराडमधील कल्याणी मैदानावर २८ एप्रिलपासून ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग सुरू आहेत. रविवारच्या प्रयोगादरम्यान संभाजी महाराजांच्या वेषातील डॉ. कोल्हे (Amol Kohle)  घोड्यावरुन एन्ट्री घेत असताना घोड्याचा मागील पाय अचानक दुमडला गेला आणि त्यामुळे पाठीला जर्क बसून त्यांच्या मणक्याला दुखापत झाली होती. मात्र त्या परिस्थितीतही डॉ. कोल्हे यांनी वेदनाशामक औषधे घेऊन प्रयोग सुरूच ठेवला होता. मात्र उर्वरीत प्रयोग रद्द करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे ही वाचा : The Kerala Story वादात मुख्यमंत्र्यांची उडी; म्हणाले, ‘हा संघाचा प्रचारचा…’

नाटकाचे प्रयोग रद्द

1 मे हा महाराष्ट् राज्याचा स्थापना दिवस असल्याने या दिवसाचे औचित्य आणि महत्व वेगळं आहे. त्यामुळे दुखापत झाली असली तरी प्रयोग करण्याचा निर्धार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. मात्र उर्वरीत दोन्ही प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलेल्या या ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे दुखापतीमुळे प्रयोग रद्द करावे लागणार असले तरी ११ मे पासून पिंपरीतील एच.ए. मैदानावरील प्रयोग तितक्याच तडफेने सादर केले जाणार आहेत.

पाठीच्या मणक्याला दुखापत झाल्याने पाठीतून तीव्र कळा जाणवत आहेत. त्यामुळे १ मे रोजीचा प्रयोग संपल्यावर मुंबईत जाऊन उपचार घेणार असून पुन्हा नव्या जोमाने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी सज्ज होणार आहे. त्यामुळे पुरेशी विश्रांती व उपचार घेऊन पिंपरी चिंचवड येथील एच. ए. मैदानावर 11 ते 16 मे कालावधीत होणारे ‘शिवपुत्र संभाजी’महानाट्याचे प्रयोग ठरल्याप्रमाणे होतील असे डॉ.अमोल कोल्हे (Amol Kohle)  म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Ponniyin Selvan – 2 : पहिल्याच दिवशी चांगली कमाई, हिंदीतही जमवला मोठा गल्ला

दरम्यान आता प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलेल्या या ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे दुखापतीमुळे प्रयोग रद्द करावे लागणार असले तरी ११ मे पासून पिंपरीतील एच.ए. मैदानावरील प्रयोग तितक्याच तडफेने सादर केले जाणार आहेत.

    follow whatsapp