सिल्वर ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा जलवा!

मुंबई तक

• 02:34 PM • 05 Apr 2021

डान्सद्वारे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. नोरा तिच्या डान्सच्या मूव्हमुळे कमी वेळातच लोकप्रिय झाली. तसंच तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे नोरा नेहमीच चर्चेचा भाग बनते. नुकतंच नोराचे काही फोटो सोशल मीडीयावर फार व्हायरल होतायत. एका अवॉर्ड फंक्शनसाठी नोराचा लूक सर्वांना फार आवडला आहे. या फंक्शनसाठी नोराने घातलेला ड्रेसची ही सगळीकडे चर्चा आहे. […]

Mumbaitak
follow google news

डान्सद्वारे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. नोरा तिच्या डान्सच्या मूव्हमुळे कमी वेळातच लोकप्रिय झाली. तसंच तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे नोरा नेहमीच चर्चेचा भाग बनते. नुकतंच नोराचे काही फोटो सोशल मीडीयावर फार व्हायरल होतायत.

हे वाचलं का?

एका अवॉर्ड फंक्शनसाठी नोराचा लूक सर्वांना फार आवडला आहे. या फंक्शनसाठी नोराने घातलेला ड्रेसची ही सगळीकडे चर्चा आहे. दरम्यान साता समुद्रापारहून नोराचा हा ड्रेस डिझाईन होऊन आला आहे. हॉलिवूड सुपरस्टार्स जेनिफर लोपेझ, ब्रिटनी स्फेअर आणि पॅरिस हिल्टन यांनी ड्रेसच्या ओव्हर ऑल लूक डिझाइन केला आहे. नोरा ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे जिच्यासाठी हॉलिवूडच्या सुपरस्टार डिझायनरने खास ड्रेस डिझाइन केला.

नोरा ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे ज्यांच्यासाठी हॉलिवूडच्या सुपरस्टार डिझायनरने खास ड्रेस डिझाइन केला होता. डिझायनर जियानिना अजार म्हणाली, ‘मी नोराचे कपड्यांचे डिझाइन करण्यास उत्सुक होती कारण ती एक आंतरराष्ट्रीय स्टार आहे जिने फार मेहनतीने विशेष स्थान मिळवलंय. मी स्वतःला भाग्यवान समजते, की मला प्रथमच भारतीय अभिनेत्री ड्रेस डिझाइन करण्याची संधी मिळाली.

    follow whatsapp