सध्या संपूर्ण देशात झोमॅटोचा डिलीव्हरी बॉय आणि बंगळूरूतील महिलेने त्याच्यावर केलेले आरोप चर्चेत आहेत. दरम्यान या प्रकरणात कोणी महिलेची बाजू घेतय तर दुसरीकडे काही जणं झोमॅटोच्या डिलीव्हरी बॉयच्या कहाणीला खरं मानतायत. तर हे प्रकरण गाजत असताना बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने याविषयी आवाज उठवला आहे.
ADVERTISEMENT
यासंदर्भात अभिनेत्री परिणीती चोप्राने सोशल मीडियावर तिचं मत मांडत या प्रकरणातील सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे. परिणीती तिच्या ट्विटमध्ये म्हणते, ‘झोमॅटो इंडिया – कृपया याप्रकरणातील सत्य शोधा आणि जाहीरपणे सर्वांना कळवा….जर तो माणूस निर्दोष असेल (मला विश्वास आहे की तो निर्दोष आहे) तर त्या महिलेला देखील दंड ठोठावण्यास मदत करा.. ही घटना अमानुष, शरमेची आणि हृदयद्रावक आहे.. मी यासाठी कशा प्रकारे मदत करू शकते हे कृपया मला कळवा.”
काय आहे नेमकं प्रकरणं?
काही दिवसांपूर्वी एका महिलेने सोशल मिडीयावर एक व्हिडीयो शेअर केला होता. या व्हिडीयोमध्ये तिने, खाण्याची ऑर्डर कॅन्सल केल्यानंतर झोमॅटोच्या डिलीव्हरी बॉयने मारहाण केल्याचं म्हटलं होतं. काही वेळातच हा व्हिडीयो प्रचंड व्हायरल झाला. त्यावेळी महिलेसोबत चुकीचं झालं असल्याचं लोकांचं म्हणणं होतं. यानंतर त्या डिलीव्हर बॉयला कामावरून बडतर्फही करण्यात आलं.
या कारवाईनंतर डिलीव्हरी बॉयनेही स्पष्टीकरण देत महिला खोटं बोलत असल्याचं सांगितलं. डिलीव्हरी बॉयच्या म्हणण्याप्रमाणे, पहिल्यांदा महिलेने त्याला चप्पलने मारण्यास सुरुवात केली. स्वतःच्या संरक्षणासाठी जेव्हा हात उचलला तेव्हा त्या महिलेच्याच हातातील अंगठी तिच्या नाकाला लागली आणि रक्त येऊ लागलं.”
डिलीव्हरी बॉयच्या स्पष्टीकरणानंतर या प्रकरणाच्या दोन बाजू समोर आल्या आहेत. यामध्ये आता सोशल मीडियावर डिलीव्हरी बॉयची बाजू घेत त्याला न्याय मिळावा अशी मागणी करतायत. तर याचसंदर्भात अभिनेत्री परिणीती चोप्राने तिचं मत मांडलं आहे.
ADVERTISEMENT