ADVERTISEMENT
चित्रपट सृष्टीतील कलाकारांना मालदिवने भुरळ घातली असून, अनेक कलाकार ब्रेक घेऊन मालदिवला जाताना दिसत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडेही मालदिवमध्ये असून, तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
बॉलिवूडबरोबरच पूजा हेगडेचं नाव आघाडीच्या दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या यादीत घेतलं जातं.
प्रोजेक्ट संपवून पूजा हेगडे सध्या मालदिवमध्ये सुटीचा आनंद घेताना दिसत आहे.
मालदिवच्या किनाऱ्यावर पूजा फिरताना दिसून आली. ती दररोज मालदिवमधील खास क्षणाचे फोटो इन्स्टावर पोस्ट करताना दिसत आहे.
पूजाच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत असून, यापूर्वीही तिने बिकिनीतील फोटो शेअर केले होते.
पूजाने मोनोकिनी अवतारातील एक फोटोही शेअर केला आहे. त्याचबरोबर एक व्हिडीओही पोस्ट केला आहे.
पूजाने ब्राऊन बिकिनीतील काही फोटो पोस्ट केले होते. जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.
पूजाच्या मालदिवमधील फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स पाऊसच पडत आहे.
पूजा हेगडे बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रीपैकी एक आहे ज्यांनी अल्पावधीत आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं.
पूजाने अभिनेता ह्रतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मोहनजोदडो’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
हाऊसफुल-४ चित्रपटातही पूजा हेगडेनं काम केलं आहे. इतरही काही चित्रपटात तिने भूमिका केल्या असून, आगामी काळात तिचे बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहे.
ADVERTISEMENT