पॉर्न चित्रपटाच्या निर्मिती प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राला अखेर जामीन मिळाला. त्यामुळे राज कुंद्राला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज कुंद्राला जामीन मिळाल्यानंतर शिल्पा शेट्टीनं केलेल्या पोस्टचीही चर्चा होत आहे.
ADVERTISEMENT
मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पॉर्न चित्रपट बनवून विविध प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला १९ जुलै रोजी अटक केली होती. राज कुंद्राविरोधात पुरावे मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. अटक झाल्यापासून राज कुंद्राकडून जामीनासाठी प्रयत्न केले जात होते.
अखेर राज कुंद्राला न्यायालयाकडून दिलासा मिळाला. सोमवारी मेट्रोलपोलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयाने राज कुंद्राला ५० हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्याचबरोबर स्थानिक पोलिसांना माहिती दिल्याशिवाय राज कुंद्राना शहर सोडता येणार नाही, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. राज कुंद्राबरोबरच त्यांचा आयटी हेड रायन थार्पलाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Pornography case : राज कुंद्राची अखेर तुरूंगातून सुटका! न्यायालयालयाकडून मोठा दिलासा
शिल्पाने शेट्टीनं काय आहे पोस्ट?
राज कुंद्राला जामीन मिळाल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली. सूर्य मावळतीकडे झुकल्यानंतरचं दृश्य असून, इंद्रधनुष्यही दिसत आहे. त्यावर इंद्रधनुष्याचं अस्तित्व हेच सांगत की, एका मोठ्या वादळानंतरही चांगल्या गोष्टी घडू शकतात’, असा सुविचार शिल्पा शेट्टीने पोस्ट केला आहे.
अटक झाल्यानंतर २७ जुलैपर्यंत राज कुंद्राला पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तेव्हापासून राज कुंद्रा तुरुंगातच आहे. राज कुंद्राने यापूर्वीही जामीनासाठी प्रयत्न केले होते. सत्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती.
Raj Kundra : कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; जाणून घ्या खास गोष्टी
राज कुंद्रा पॉर्न चित्रपट निर्मिती प्रकरणात मुंबई पोलिसांनी तब्बल 1500 पानांचं आरोपपत्र दाखल केलेलं आहे. या प्रकरणात 58 जणांच्या साक्षी नोंदवण्यात आलेल्या आहेत. यात शिल्पा शेट्टीचाही जबाब नोंदवलेला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हे आरोपपत्र दाखल केलेलं असून, या आरोपपत्रात पीडित मुलींचा लैंगिक छळ करणे, त्यांची फसवणूक करणं तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमांनुसार पोलिसांनी आरोप लावले आहेत.
ADVERTISEMENT