देसी गर्ल.. प्रियंकाचा देसी लूक पाहा

मुंबई तक

• 06:08 PM • 09 Nov 2021

अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने अमेरिकेत आपली दिवाळी खास देसी अंदाजात साजरी केली आहे. दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये प्रियंका चोप्राचा देसी लूक खूपच चर्चेत होता प्रियंकाच्या दिवाळी सेलिब्रेशनचे नवे फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये ती रेट्रो लूकमध्ये दिसत आहे. प्रियंका चोप्रा हिने नुकतीच लिली सिंह हिची दिवाळी पार्टी अटेंड केली आहे. या पार्टीसाठी प्रियंका खास रेट्रो लूकमध्ये पोहचली […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने अमेरिकेत आपली दिवाळी खास देसी अंदाजात साजरी केली आहे.

दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये प्रियंका चोप्राचा देसी लूक खूपच चर्चेत होता

प्रियंकाच्या दिवाळी सेलिब्रेशनचे नवे फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये ती रेट्रो लूकमध्ये दिसत आहे.

प्रियंका चोप्रा हिने नुकतीच लिली सिंह हिची दिवाळी पार्टी अटेंड केली आहे.

या पार्टीसाठी प्रियंका खास रेट्रो लूकमध्ये पोहचली होती. सोशल मीडियावर तिचे हो फोटो खूपच व्हायरल होत आहेत.

या पार्टीत प्रियंकाने जो ड्रेस परिधान केला होता. तो फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी हिने डिझाइन केला होता.

प्रियंकाने शॉर्ट कुर्तासह फ्लेअर्ड पेंटला टीमअप केलं होतं. यासह मॅचिंग दुपट्टादेखील कॅरी केला होता.

प्रियंकाच्या या फोटोंवर तिचे चाहते खूपच खुश आहेत. त्यांनी या फोटोंना प्रचंड लाइक्स दिले आहेत.

मोकळे सोडलेले केस आणि ग्रीन नेकलेस प्रियंकाच्या सौंदर्यात अधिकच भर टाकत होते.

प्रियंका या लूक देखील अतिशय सुंदर दिसत असल्याच्या कमेंट तिचे चाहते सोशल मीडियावर देत आहेत.

यंदा प्रियंकाने आपला पती निक जोनससह आपल्या अमेरिकेतील घरीच दिवाळी साजरी केली आहे.

निक आणि प्रियंकाच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा ही अमेरिकेतच स्थायिक झाली आहे. पण ती तिथेही आपले सण आवर्जून साजरे करते.

    follow whatsapp