Honey Singh Divorce: 12 वर्षांनंतर हनी सिंगचा घटस्फोट, पत्नीने केलेला हिंसाचाराचा आरोप

मुंबई तक

• 03:25 PM • 07 Nov 2023

Honey Singh: प्रसिद्ध रॅपर-गायक हनी सिंगचा आखेर घटस्फोट झाला आहे. हनी आपल्या वैवाहिक आयुष्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

honey singh wife, yo yo honey singh love dose, honey singh age, honey singh new song, honey singh children, honey singh daughter name, honey singh family, honey singh comeback

honey singh wife, yo yo honey singh love dose, honey singh age, honey singh new song, honey singh children, honey singh daughter name, honey singh family, honey singh comeback

follow google news

नवी दिल्ली: रॅपर सिंगर हनी सिंहबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. हनी सिंहचा पत्नी शालिनीपासून घटस्फोट झाला आहे. प्रसिद्ध गायक आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. अखेर दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने या जोडप्याच्या विभक्त होण्यास मान्यता दिली आहे. हनी सिंग आणि त्याची पत्नी यांच्यातील अडीच वर्षे जुने प्रकरण निकाली काढत कौटुंबिक न्यायालयाने दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. (rapper singer honey singh has got divorced honey was in news for a long time regarding his married life)

हे वाचलं का?

अडीच वर्षे सुरू होता खटला

हनी सिंग आणि शालिनी तलवार यांच्या घटस्फोटाचा खटला अडीच वर्षांपासून न्यायालयात सुरू होता. अखेर यावर निर्णय झाला आहे. शालिनीने हनीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. घटस्फोटाला मंजुरी देण्यापूर्वी न्यायालयाने हनी सिंगला शेवटच्या वेळी विचारले की, तो अजूनही पत्नीसोबत राहण्याचा प्रयत्न करू इच्छितो का? यावर हनी सिंगने उत्तर दिले की, आता एकत्र राहण्यात काही अर्थ नाही. आता एकत्र राहणे अशक्य आहे. शालिनीनेही हनीच्या या मुद्द्याला होकार दिला. कोर्टात दोघांनीही वेगळे राहण्याचं मान्य केलं.

हनी आणि शालिनीने एकमेकांवरचे आरोपही मागे घेतले आहे. पण या जोडप्यामध्ये कोणत्या अटींवर घटस्फोट झाला त्याची कारण बंद लिफाफ्यात ठेवण्यात आली आहेत. घटस्फोटाच्या सुनावणीत हनी सिंहसोबत मेटलॉ ऑफिसचे भागीदार ईशान मुखर्जी, वकील अमृता चॅटर्जी आणि जसपाल सिंग होते.

शालिनी घरगुती हिंसाचाराची बळी

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या सुनावणीनंतर हनी सिंगने आपली पत्नी शालिनीकडे 1 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्टही सेटलमेंटच्या निर्णयाचा भाग म्हणून सुपूर्द केला होता. त्याचवेळी शालिनीने हनीवर गंभीर आरोप केले होते. आपण भीतीच्या छायेत जगत असल्याचेही तिने म्हटलेले. हनी सिंह आणि त्याचे कुटुंबीय मानसिक, शारीरिक, भावनिक, लैंगिक आणि आर्थिक हिंसाचार करत असल्याचा आरोप शालिनीने केला होता.

हनी सिंग आणि शालिनी तलवार यांनी प्रेमविवाह केला होता. दोघेही एकमेकांना बराच काळ डेट करत होते. त्यानंतर 2011 मध्ये दिल्लीतील गुरुद्वारामध्ये या जोडप्याने शीख रितीरिवाजांनुसार लग्न केलं होतं. हनीने अगदी गुपचूप लग्न केले. एका रिअॅलिटी शोदरम्यान रॅपरने याचा खुलासा केला होता. शालिनीसोबतच्या त्याच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. यानंतर त्याने सांगितले की तो विवाहित आहे आणि त्याच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत.

    follow whatsapp