सैराट फेम रिंकू राजगुरु सोशल मिडीयावर खूप अक्टिव्ह असते. रिंकू आता नव्या कोणच्या चित्रपटामध्ये झळकणार याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता असते. लवकरच तिचा छुमंतर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान हा चित्रपट दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून रिंकूने या सिनेमाच्या डबिंगला सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT
रिंकूच्या छुमंतर या सिनेमाचं शूटींग लंडनमध्ये करण्यात आलंय. या चित्रपटाच्या शूटींगनंतर रिंकूने डबिंग करण्यास सुरुवात केली आहे. नुकतंच तिने सोशल मिडीयावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने चित्रपटाच्या डबिंगला सरुवात केल्याचं दिसतंय.
निर्माते नितीन वैद्य यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर समीर जोशी यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटामध्ये रिंकू राजगुरूसोबत प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना झळकणार आहे. रिंकून या सिनेमाच्या शूटींगदरम्यानचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये रिंकूच्या पाठीवर बॅग होती आणि तिचा हा फोटो सोशल मिडीयावर चांगला व्हायरल झाला होता.
दरम्यान अभिनेत्री प्रार्थना बेहरेने या चित्रपटाचं शूटींग पूर्ण करून काही दिवसांपूर्वी डबिंगला सुरुवात केली होती. यासंदर्भात तिने सोशल मिडीयावर व्हिडीयो शेअर केला होता. या व्हिडीयोमध्ये चित्रपट बनवण्याच्या प्रक्रियेतील माझं सर्वात आवडतं काम..डबिंग असं म्हटलं होतं.
ADVERTISEMENT