बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख फिल्म इंडस्ट्रीमधलं असं नाव आहे की जो आपल्या मस्तमौला अंदाजासाठी ओळखला जातो. त्याचा अप्रतिम सेन्स ऑफ ह्यमूर आणि हजरजबाबीपणाबद्दल सगळेच जाणतात. हे फार कमी लोकांना माहिती आहे की शाहरूख अभिनयाव्यतिरिक्त टेक्नोसेव्ही सुध्दा आहे. या त्याच्या टेक्नोलॉजी प्रेमाविषयीचा मजेदार किस्सा नुकताच अभिनेता रितेश देशमुखने शेअर केला. बघूया नेमका काय आहे तो किस्सा
ADVERTISEMENT
नुकताच रितेश देशमुखच्या झालेल्या मुलाखतीत रितेशने शाहरूखचा हा किस्सा सांगितला. रितेश म्हणाला की हा त्यावेळचा किस्सा आहे ज्यावेळी आयफोन नुकताच जगात लॉन्च झाला होता.. आणि भारतात खूप कमी जणांकडे आयफोन असायचा. त्यावेळी माझ्याकडे दोन आयफोन होते. माझ्या ओळखीचे एक गृहस्थ अमेरिकेतून भारतात येत होते. आणि त्यांनी माझ्यासाठी अमेरिकेतून दोन आयफोन आणले होते.ज्यावेळी आयफोन लॉन्च झाला त्याचवेळी तो फोन माझ्या हातात होता.
मला माहित होतं की शाहरूख खान खूप टेक्नोसेव्ही आहेत.आणि म्हणूनच मी माझ्याकडचा एक आयफोन त्यांना गिफ्ट करायचं ठरवलं. मला माहित होतं की त्यांना मी हा फोन गिफ्ट केला तर त्यांना खूप आनंद होईल. मी त्यांना आयफोन गिफ्ट केला. आणि माझा अंदाज अगदी खरा ठरला. आयफोन पाहून शाहरूख खान खूप खूष झाले. त्यांनी मला त्याचदिवशी रात्री ११ वाजता फोन केला. आणि गिफ्ट केलेल्या आयफोनची खूप तारीफ केली. आणि जे बोलले ते ऐकून मी आणि जेनेलियाही दोन मिनीटं शॉक झालो. शाहरूख खान म्हणाले रितेश मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे. आणि थोड्या पॉजनंनतर ते मोठ्या मोठ्याने हसायला लागले. त्यांनी माझी गंमत केली होती. आणि मी आणि जेनेलिया त्यांच्या हसण्यानंतर थोडे रिलँक्स झालो.
ADVERTISEMENT