कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाची परिस्थिती गंभीर झाली आहे. व्हायरसचा प्रसार अधिक होताना दिसत असून रूग्णांच्या संख्येत देखील वाढ होताना दिसतेय. अनेक ठिकाणी बेड्स तसंच ऑक्सिजनची कमतरता दिसून येतेय. रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार पुढे आलेत. तर आता अभिनेता सलमान खानने देखील यामध्ये पुढाकार घेतला आहे.
ADVERTISEMENT
यापूर्वी देखील सलमान खानने कोरोनाच्या संकटाकाळात अनेकांना मदतीचा हात पुढे केला होता. आता त्याने करोनामध्ये अनाथ झालेल्या मुलाच्या मदतीसाठी पुढे आला आहे. सलमानने एका गरजू मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे.
युवासेनेचे अध्यक्ष राहुल एस. कनल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सलमान कोरोनामुळे एकट्या पडलेल्या मुलांना मदत करतोय. नुकतंच त्याने कर्नाटकातील 18 वर्षांच्या मुलाच्या खाण्यापिण्याची तसंच शिक्षणाची जबाबदारी स्वीकारलीये. या मुलाच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.”
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा राधे हा सिनेमा चर्चेत आहे. मे महिन्यात हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. चित्रपटामध्ये सलमानबरोबर अभिनेत्री दिशा पाटणी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.
ADVERTISEMENT