अहो ऐका ना ! Bigg Boss च्या घरात शमिता शेट्टीने मराठमोळ्या अंदाजात काढली राकेश बापटची आठवण

मुंबई तक

• 12:43 PM • 07 Oct 2021

बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि मराठमोळा अभिनेता राकेश बापट यांच्यातली केमिस्ट्री गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनली आहे. बिग बॉस ओटीटीच्या घरात राकेश आणि शमिता स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. यावेळी दोघांचा रोमँटीक अंदाज सर्वांना आवडला होता. सलमान खान सूत्रसंचालन करत असेलल्या बिग बॉसच्या आगामी हंगामातही शमिता शेट्टी सहभागी झाली आहे. परंतू घरात आता तिला […]

Mumbaitak
follow google news

बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि मराठमोळा अभिनेता राकेश बापट यांच्यातली केमिस्ट्री गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनली आहे. बिग बॉस ओटीटीच्या घरात राकेश आणि शमिता स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. यावेळी दोघांचा रोमँटीक अंदाज सर्वांना आवडला होता.

हे वाचलं का?

सलमान खान सूत्रसंचालन करत असेलल्या बिग बॉसच्या आगामी हंगामातही शमिता शेट्टी सहभागी झाली आहे. परंतू घरात आता तिला राकेश बापटची आठवण यायला लागली आहे. यावेळी घरातील सदस्यांसोबत बोलत असताना तिने आपली खास आठवण सांगितल्यानंतर प्रत्येक जण तिची मस्करी करायला लागला आहे.

प्राजक्ता माळीचा पार्टी लूक करतोय चाहत्यांना घायाळ

विधी पांड्या, उमर रियाज, विशाल कोटीयन, तेजस्वी प्रकाश, जय भानूशाली आणि शमिता शेट्टी एकत्र बसून गप्पा मारत असताना जयने शमिताला मराठी बायको आपल्या नवऱ्याला कसं बोलावते अहे सांगितलं. यावेळी शमितानेही त्याची बरोबर नक्कल करत, अहो ऐकलंत का असं म्हणत राकेशवर असलेल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

या दरम्यान, तेथे उपस्थित कुटुंबातील सदस्यांनी शमिताला चीअर अप केले. शमिताची छेड काढताना, कुटुंबातील सदस्य असेही म्हणतात की आता राकेश देखील लवकरच बिग बॉसमध्ये येणार आहे. यानंतर तेजस्वीने शमिताला ‘पोहे’ बनवायला सांगितले, ज्यावर शमिता म्हणाली की, “ती राकेशसाठी घरी स्वयंपाक करणारी ठेवेल, कारण राकेश खूप फुडी आहे.”

    follow whatsapp