मराठी अभिनेता शशांक केतकर लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी वाहिनीवरच शशांकची नवी मालिका येतेय. पाहिले न मी तुला असं या मालिकेचं नाव असून या सिरीयलमध्ये शशांक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शशांक पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार असल्याने त्याचे चाहते मात्र फार उत्सुक आहेत.
ADVERTISEMENT
पाहिले न मी तुला या मालिकेत शशांकची काय भूमिका असणार आहे हे अजून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यामुळे शशांकची भूमिका त्याच्या चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज असणार आहे. येत्या 1 मार्चपासून ही मालिका सुरु होणार आहे. या मालिकेचा एक छोटा व्हिडीयो इन्स्टाग्रामवर पोस्टही करण्यात आलाय.
तर शशांकसोबत या मालिकेत आशय कुलकर्णी आणि तन्वी मुंडले देखील दिसणार आहेत. दे दोघंही या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत. आशयने यापूर्वी माझ्या होशील ना या मालिकेत डॉ. सुयशची भूमिका साकारली होती. तर तन्वी हा एक नवा चेहरा प्रेक्षकांसमोर येणार आहे.
होणार सून मी या घरची या मालिकेतून लोकप्रिय झाला. यानंतर नकटीच्या लग्नाला यायचं, इथेच टाका तंबू आणि हे मन बावरे या मालिकांमध्येही त्याने काम केलंय. शिवाय वन वे तिकीट, 31 दिवस तसंच आरॉन या चित्रपटांमध्येही त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
ADVERTISEMENT