Pragya Nagra viral video: चेन्नई: तेलगू फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री प्रज्ञा नागारा तिचा एक कथित खाजगी व्हिडिओ ऑनलाइन लीक झाल्यानंतर वादात सापडली आहे. आता या सुंदर अभिनेत्रीची एक इंटिमेट व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या लीक झालेल्या व्हिडिओच्या सत्यतेबाबत प्रज्ञा नागरा किंवा तिच्या टीमने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (south actress pragya nagras alleged private video leaked)
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
काही काळापूर्वी अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटी खासगी व्हिडिओ लीकचे बळी ठरल्यानंतर आता तेलुगू फिल्म इंडस्ट्रीची नवी अभिनेत्री प्रज्ञा देखील याची शिकार झाली आहे. ती आता या 'लीक स्कँडल'मध्ये अडकली आहे. मात्र, प्रज्ञाचे खासगी व्हिडिओ ऑनलाइन कसे लीक झाले हे सध्या तरी कळू शकलेले नाही. लीक झालेल्या या व्हिडिओ क्लिपमध्ये प्रज्ञा नागराला आक्षेपार्ह स्थितीत दाखवण्यात आले आहे.
हे ही वाचा>> Nimrat Kaur Viral Post : निमरत कौरला मिळाला नवा पार्टनर! अभिषेक बच्चनसोबतच्या डेटिंगच्या चर्चांना पूर्णविराम?
प्रज्ञा नागरा ही एक अतिशय लोकप्रिय सोशल मीडिया स्टार आहे. जिचे Instagram वर सुमारे 1.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. इतकंच नाही तर ती तेलुगु आणि तमिळ चित्रपट इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी देखील ओळखली जाते. तिने अलीकडच्या काळात अनेक मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे.
प्रज्ञाने 2022 मध्ये तामिळ चित्रपट ‘वरलारू मुक्कियम’ आणि 2023 मध्ये ‘नधिकलिल सुंदरी यमुना’ या मल्याळम चित्रपटाद्वारे पदार्पण केले. यासोबतच तिने N4 या तमिळ चित्रपटात 'स्वाथी'ची भूमिकाही साकारली होती. 22 नोव्हेंबर रोजी प्रीमियर झालेला तिचा तेलगूमधील 'लग्गम' हा नवीन चित्रपट होता. या चित्रपटात अभिनेत्री सई रौनकचीही महत्त्वाची भूमिका होती.
हे ही वाचा>> CM फडणवीस शिवसेनेच्या 'या' नेत्यांचा कापणार पत्ता?, कॅबिनेटमध्ये स्थानच नाही?
प्रज्ञाचा जन्म हा हरियाणातील अंबाला येथील पंजाबी कुटुंबात झाला होता. असे सांगितले जात की, मॉडेल म्हणून करिअर सुरू करण्यापूर्वी तिने तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत पूर्ण केले. प्रज्ञाचे वडील भारतीय सशस्त्र दलात कार्यरत होते आणि ते चेन्नई येथे तैनात होते. महाविद्यालयीन पदवी घेत असताना, प्रज्ञाला मॉडेलिंगमध्ये रस निर्माण झाला आणि ती आजपर्यंत 100 हून अधिक जाहिरातींमध्ये दिसली आहे.
ADVERTISEMENT