द कश्मीर फाईल्स येतोय ओटीटी प्लॅटफॉर्मवर, कुठे आणि कधी बघता येणार?

मुंबई तक

• 02:30 AM • 20 Apr 2022

कश्मिरी पंडितांच्या विस्थापनावर आधारित द कश्मीर फाईल्स चित्रपटाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. चित्रपटाबद्दल बरीच चर्चा झाली. राजकीय वर्तुळातही हा चित्रपट वादाचा विषय बनल्याचं दिसलं. बॉक्स ऑफिसचा विचार केला, तर चित्रपटाने बक्कळ कमाई केली. ११ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या द कश्मीर फाईल्सने महिनाभर चित्रपटगृहात वर्चस्व कायम ठेवलं. महिन्याहून अधिक काळ चित्रपटगृहात लागलेला द कश्मीर फाईल्स तरीही […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

कश्मिरी पंडितांच्या विस्थापनावर आधारित द कश्मीर फाईल्स चित्रपटाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला.

चित्रपटाबद्दल बरीच चर्चा झाली. राजकीय वर्तुळातही हा चित्रपट वादाचा विषय बनल्याचं दिसलं.

बॉक्स ऑफिसचा विचार केला, तर चित्रपटाने बक्कळ कमाई केली. ११ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या द कश्मीर फाईल्सने महिनाभर चित्रपटगृहात वर्चस्व कायम ठेवलं.

महिन्याहून अधिक काळ चित्रपटगृहात लागलेला द कश्मीर फाईल्स तरीही अनेकांना बघता आला नाही. अशा प्रेक्षकांना आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा बघता येणार आहे.

हो, द कश्मीर फाईल्स चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज होतोय. झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर द कश्मीर फाईल्स चित्रपट प्रदर्शित होत आहे.

रिपोर्टसनुसार १३ मे रोजी हा चित्रपट झी 5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रदर्शनाच्या तारखेती अधिकृत घोषणा मात्र, अद्याप केली गेलेली नाही.

चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईबद्दल बोलायचं झालं, तर द कश्मीर फाईल्स चित्रपटाने दोन आठवड्यातच २०० कोटींहून अधिक व्यवसाय केला.

तिसऱ्या आठवड्यात एसएस राजमौली यांचा आरआरआर प्रदर्शित झाला. मात्र, त्याचा फार परिणाम द कश्मीर फाईल्सवर झाला नाही.

    follow whatsapp