जगण्याचा संघर्ष आणि जगण्याला हातभार लावण्यासाठी मिळत असलेली पेन्शन…या सर्व परिस्थितीची कथा पेन्शन या सिनेमातून उडगडण्यात येणार आहे. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
ADVERTISEMENT
पेन्शन या सिनेमात सोनाली कुलकर्णी सोबत सुमीत गुट्टे तसंच निलांबरी खामकर देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. एका गरीब कुटुंबाला जगण्यासाठी पेन्शनचं असणारं महत्त्व या सिनेमातून दाखवण्यात आलंय. भावूक आणि संवेदनशील अशी सिनेमाची कथा असणार आहे. या सिनेमात ‘इंद्र’ नावाच्या मुलाचं बालपण ते तो मोठा होईपर्यंतचा प्रवास पाहायला मिळेल. घरातील आजीच्या पेन्शनवर अवलंबून असलेलं कुटुंब पेन्शन चालू राहावी म्हणून काय काय करतं, हे यातून दिसून येतंय.
‘इरॉस नाऊ’ ने पेन्शन या सिनेमाची निर्मिती केलीये. तर पुंडलिक धुमाळ यांनी सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं. येत्या 24 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
ADVERTISEMENT