Sherni: विद्या बालनच्या शेरनी सिनेमाचा ट्रेलर अखेर रिलीज

मुंबई तक

• 08:39 AM • 02 Jun 2021

अभिनेत्री विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित शेरनी सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला. या सिनेमात विद्या बालन वनअधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. जगातील २४० हून अधिक देशांमध्ये १८ जूनला अँमेझॉन प्राईम ओटीटीवर शेरनी रिलीज होणार आहे.टी-सिरीज आणि अबंडनतिया एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या या मस्ट वॉच प्रकारातील चित्रपटाचं दिग्दर्शन न्यूटन’फेम फिल्ममेकर अमित मसुरकर याने केलं आहे. आपल्या […]

Mumbaitak
follow google news

अभिनेत्री विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित शेरनी सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला. या सिनेमात विद्या बालन वनअधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. जगातील २४० हून अधिक देशांमध्ये १८ जूनला अँमेझॉन प्राईम ओटीटीवर शेरनी रिलीज होणार आहे.टी-सिरीज आणि अबंडनतिया एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या या मस्ट वॉच प्रकारातील चित्रपटाचं दिग्दर्शन न्यूटन’फेम फिल्ममेकर अमित मसुरकर याने केलं आहे. आपल्या अनोख्या शैलीसाठी अमित प्रसिद्ध आहेत.आपल्या पितृसत्ताक पद्धतीत सामाजिक अडथळे निर्माण करणारी मानवी श्वापदे वावरत असतात, विद्या ज्या विभागात कार्यरत असते, तिथली उदासीनताच तिला जोशाने स्वत:ची धमक सिद्ध करण्याची ऊर्जा देते. चित्रपटाचा ट्रेलर रोमांचक असून विद्याच्या प्रवासावर भाष्य करतो. हे जग चमत्कारी, आपल्या अनुभवाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तिरेखांनी भरलेले आहे. आपली चाकोरी बाहेरची नोकरी सांभाळून विद्या विवाहित आयुष्य जगत असते. हे करत असताना मानव नावाच्या पशूचा सामना तिला करावा लागतो. या चित्रपटात शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राज, इला अरूण, ब्रिजेंद्र काला आणि नीरज काबी यांच्या मुख्य भूमिका आहेत

हे वाचलं का?

ट्रेलर लॉन्चप्रसंगी अभिनेत्री विद्या बालन म्हणाली की, ‘मी पहिल्यांदा शेरनी’चे कथानक ऐकलं आणि ते मला भावलं. मी व्यक्तिरेखेत शिरले. मी साकारत असलेली चित्रपटातील विद्या काही शब्दांत समजावून घेता येईल. मात्र व्यक्तिरेखेचे अनेक पैलू आहेत. या चित्रपटाचा विषय अतिशय संवेदनशील आहे. आदर, परस्परांना समजून घेणे आणि सह-अस्तित्वाच्या धाग्यांनी गुंतलेले आहे. ते केवळ मानव-पशू द्वंद नसून माणसा-माणसातील नात्यांवर भाष्य करणारे आहे. ही अभिनव व्यक्तिरेखा साकारताना मला फारच आनंद झाला.

    follow whatsapp