Vinod Khanna : बॉलिवूड (Bollywood) स्टारडम सोडून संन्यास घेण्याचा मार्ग स्वीकारणारे अभिनेते विनोद खन्ना (Vinod Khanna) 1982 मध्ये अमेरिकेतील ओरेगॉन राज्यातील ओशोंच्या रजनीशपुरम आश्रमात गेले. पाच वर्षे तेथे राहिले. यावेळी त्यांनी ध्यान आणि अध्यात्मासोबतच माळी काम हाती घेतले. आश्रमात त्यांचे नाव विनोद भारती असे होते. परंतु ज्या मनःशांतीसाठी त्यांनी अध्यात्माचा आश्रय घेतला होता, ती त्यांना प्राप्त झाली नाही. कारण यामुळे त्यांचे मुंबईतले कुटुंब उद्ध्वस्त झाले. (Vinod Khanna First Marriage Broken Due to osho New Life Partner is 16 years younger than him)
ADVERTISEMENT
विनोद खन्ना यांनी एकदा स्वत:च सांगितले होते की, ‘संन्यासा घेण्याचा निर्णय हा फक्त माझ्यासाठीच होता. यामुळेच माझ्या घरच्यांना माझ्या निर्णयाचं दु:ख झालं. मलाही दोन्ही मुलांच्या संगोपनाची काळजी वाटत होती, पण माझे मन असहाय्य होते.’
वाचा : Lok Sabha : “ती महिला जागेवरच बेशुद्ध पडली”, खासदाराने सांगितला लोकसभेतील थरार
संन्यास घेण्याचा निर्णय विनोद खन्ना यांची मजबुरी होती की, मनाचा गोंधळ?
संन्यासामुळे विनोद खन्ना यांची कारकीर्द ठप्प झाली आणि त्यांचे कुटुंबही अशा प्रकारे उद्ध्वस्त झाले की ते पुन्हा एकत्र येऊ शकले नाहीत. अमेरिकेतील ओशो आश्रमात राहून ते पहिली पत्नी गीतांजलीपासून वेगळे झाले. 1985 मध्ये घटस्फोटाने हे प्रकरण संपुष्टात आले, पण विनोद खन्ना यांना काही संन्यास घ्यावासा वाटला नाही. भारतात परतण्याबाबतही ते अनेकदा बोलायचे.
मुंबईत परतल्यानंतर एकीकडे चित्रपटसृष्टीत पुन्हा स्वत:ला सिद्ध करण्याची धडपड तर दुसरीकडे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाची व्यथा. विनोद यांना हा काळही बदलून टाकायचा होता. यादरम्यान १६ वर्षांनी लहान असलेल्या कविताशी एकेदिवशी ऑफिसमध्ये भेट झाली, अगदी योगायोगानेच ही भेट झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
वाचा : संसदेत घुसणाऱ्या तरुणाचं महाराष्ट्र कनेक्शन काय? सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू
अमेरिका आणि युरोपमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर कविता तिचे उद्योगपती वडील सरयू दफ्तरी यांचा व्यवसाय सांभाळत होत्या. विनोद खन्ना यांची पहिली भेट एका पार्टीत झाली, ज्यामध्ये कविता कोणत्याही आमंत्रणाशिवाय मैत्रिणींसोबत आली होती. कविताच्या बाजूने ती भेट औपचारिक होती, पण विनोद खन्ना त्या पहिल्या भेटीतच कविताचे चाहते झाले. एक वर्षाच्या भेटीनंतर, विनोद खन्ना यांनी कविताशी लग्न करणार असल्याचे जाहीर केले. जी त्यांच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान होती.
विनोद खन्ना यांचे आयुष्य कविताने नव्याने स्थिरावत केले. या काळात त्यांना त्याच्या वयानुसार चित्रपट मिळत होते. मात्र, ९० च्या दशकात आमिर, सलमान, शाहरुख या नव्या जमान्यातील स्टार्सची क्रेझ होती. त्यामुळे विनोद खन्ना यांच्याकडे फार कमी पर्याय होते.
वाचा : Security Breach in Parliament : 22 वर्षांपूर्वी असाच हादरला होता देश! काय घडलं होतं 13 डिसेंबरला?
याच काळात त्यांनी त्यांचा मुलगा अक्षय खन्नाला लाँच करण्यासाठी हिमालयपुत्र नावाचा चित्रपट तयार केला. 1997 मध्ये, विनोद खन्ना यांनी वडील म्हणून जबाबदारी पार पाडली, परंतु व्यक्तिशः सिनेमातून पुन्हा एक वेगळी भूमिका घेतली. ते राजकारणाचाही भाग होते.
ADVERTISEMENT