झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला हि लोकप्रिय मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. स्वीटू आणि ओमच्या प्रेमाची नलू परीक्षा घेतेय. अनेक अडचणींवर मत करून ओम या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी धडपड करतोय. त्यातच स्वीटू आणि ओम मध्ये गैरसमज देखील निर्माण होत आहेत पण त्यामागे मोहित आणि मालविका यांचा हात आहे.मालविकाच्या सांगण्यावरून मोहित ओमच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण करतोय पण काही केल्या ओम हार मानत नाही आहे हे बघितल्यावर मोहितच्या डोक्यात आता नवीन डाव शिजतोय. चिन्याला नोकरी लागल्यामुळे घरी सगळे खुश आहेत आणि त्याच्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी मोहित त्याचा अपघात घडवून आणतो. हे कळल्यावर स्वीटू आणि ओम तातडीने चिन्याकडे जातात आणि ओमच्या सांगण्यावरून चिन्यावर उपचार देखील सुरु होतात पण मालविका हिला कळतं कि हा अपघात घडवून आणण्यामागे मोहितचा हात आहे. अशावेळी मालविका साळवी कुटुंबाची साथ देईल? कि मोहितच्या चुकीवर पडदा टाकेल? मालविकाचा स्टॅन्ड काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
मोहितने घडवून आणला चिन्याचा अपघात, हे कळल्यावर काय करणार मालविका?
मुंबई तक
• 09:11 AM • 28 Jul 2021
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला हि लोकप्रिय मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. स्वीटू आणि ओमच्या प्रेमाची नलू परीक्षा घेतेय. अनेक अडचणींवर मत करून ओम या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी धडपड करतोय. त्यातच स्वीटू आणि ओम मध्ये गैरसमज देखील निर्माण होत आहेत पण त्यामागे मोहित आणि मालविका यांचा हात आहे.मालविकाच्या सांगण्यावरून मोहित ओमच्या […]
ADVERTISEMENT