Horoscope In Marathi : सूर्यासारखं चमकेल 'या' राशींचं भाग्य! दिवाळीआधीच काही राशी होतील मालामाल

मुंबई तक

26 Oct 2024 (अपडेटेड: 26 Oct 2024, 07:00 AM)

26 October 2024 Horoscope : ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याची माहिती दिली जाते.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

या राशींचं नशीब चमकणार? तुमचं भविष्य काय?

point

काही राशीच्या लोकांना मिळणार पैसाच पैसा, तर काही होतील कंगाल

point

या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल आरोग्याची काळजी

26 October 2024 Horoscope : ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याची माहिती दिली जाते. 26 ऑक्टोबर  2024 ला शनिवार आहे. शनिवारच्या दिवशी  हनुमानाची पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार, हनुमानाची पूजा केल्यानं सुख-समृद्धी प्राप्त होते. ज्योतिष गणनेनुसार, 26 ऑक्टोबरचा दिवस काही राशींसाठी शुभ असणार आहे. तर काही राशींच्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो, जाणून घ्या सर्व राशींबद्दल सविस्तर माहिती.

हे वाचलं का?

मेष राशी 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असेल. कार्यात सकारात्मक रिझल्ट मिळेल. कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी वाढेल. आर्थिक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल.

वृषभ राशी

आज वृषभ राशीच्या लोकांची कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात सुटका होऊ शकते. सामाजिक जीवनात प्रगती होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळेल. घरात सुख शांती नांदेल.

मिथुन राशी 

आज मिथुन राशीच्या लोकांना कौटुंबीक सहकार्य मिळेल. आयुष्यात नवीन गोष्टी सुरु करा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कार्यालयीन कामकाजात व्यस्त राहाल. 

कर्क राशी

आज कर्क राशीच्या लोकांची व्यवसायीक स्थिती चांगली राहिल. आरोग्य संबंधीत गोष्टीमध्ये दिलासा मिळेल. लाईफस्टाईलमध्ये थोडे बदल होतील. मित्रांसोबत प्रवासाचा योग बनेल.

हे ही वाचा >>  Kitchen Tips : नारळ सोलून वैतागलात? 'या' सोप्या ट्रिक्सने खोबरं येईल झटपट बाहेर अन् वेळंही वाचेल

सिंह राशी

आज सिंह राशीच्या लोकांना अनेक सोर्सकडून धनप्राप्ती होईल. घरात पाहुणे आल्याने आनंदाचं वातावरण निर्माण होईल. आजच्या दिवशी दूरचा प्रवास योग असेल.

कन्या राशी 

आज कन्या राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होऊ शकतो. नवीन कामांची सुरुवात होईल. कौटुंबीक जीवनात संकटं येऊ शकतात. आरोग्याबाबत दिलासा मिळेल.

तुळा राशी 

आज व्यवसायीक जीवन आव्हानात्मक असेल. कुटुंब आणि मित्रांसोबत चांगली वेळ घालवाल. आरोग्यात सुधारणा होईल. नोकरी करणारे व्यस्त राहतील. आर्थिक गोष्टीत चढ-उतार पाहायला मिळेल.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. पूर्वीच्या समस्या दूर होतील. कार्यालयात नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळेल. घरात वादविवादांपासून सावध राहा. प्रियकराचं प्रेम आणि सपोर्ट मिळेल.

हे ही वाचा >> Love Relationship: 'माझं तुझ्यावर लय प्रेमंय...', असं प्रपोज मुलंच करतात, मुलीचं काय अडतं?

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. मन प्रसन्न राहणार नाही. उद्योगात आर्थिक नुकसान होऊ शकतं. विचार करून गुंतवणूक करा. 

मकर राशी 

आज मकर राशीच्या लोकांच्या व्यावसायीक जीवनात अडचण निर्माण होऊ शकते. संपतीबाबत वादविवाद होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होईल. कुटुंबासोबत ट्रीपला जाऊ शकता. आरोग्य उत्तम राहील.

मीन राशी 

आज मीन राशीच्या लोकांच्या मनासारखं होईल. घरात धार्मिक कार्याचं आयोजन होऊ शकतं. करिअरमध्ये प्रगती होईल. कार्यालयातील राजकारणापासून सावध राहा.

    follow whatsapp