Chanakya Niti : लहान मुलांचा सांभाळ करणे किंवा त्यांच्यावर संस्कार करणे हे काही खुप सोप्प काम नाही आहे. यासाठी खुप मेहनत घ्यावी लागते. विशेष म्हणजे सर्वात आधी आई-वडिलांनी स्वत:च्या व्यक्तीमत्वावर काम करणे गरजेचे आहे. कारण आई-वडील जसे मुलांसमोर वागतात, तसेच संस्कार त्यांच्यावर होत असतात. त्यामुळे तुमच्या काही चुका मुलांचा भविष्य खराब करू शकतात. याबाबतीत चाणक्य नितीत काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यानुसार आई-वडिलांच्या या चुका मुलांचे भविष्य खराब करू शकतात. या चुका नेमक्या काय आहेत, हे जाणून घेऊयात. (chanakya niti these three bad habits parents will spoil future of children)
ADVERTISEMENT
खरं तर आई वडील मुलांवर संस्कार करताना काही अशा चुका करून जातात, ज्यांचे नुकसान त्यांच्या भविष्यावर होत असते. अशाच काही चुका आचार्य चाणक्यने निती शास्त्रात सांगितल्या आहेत. आई-वडिलांच्या या चुकांचा मुलांच्या भविष्यावर परिणाम करतात. या चुका खालील वाचूयात.
हे ही वाचा : Amol Shinde : कल्याणमधून 1200 रुपयांत घेतले 5 स्प्रे; अमोलने पोलिसांना काय सांगितलं?
कडवट भाषा
अनेक पालकांना त्यांच्या लहान मुलांसमोर कडवट आणि असभ्य भाषा बोलण्याची सवय असते. हीच सवय नंतर लहान मुले आत्मसात करतात आणि नंतर पुढे जाऊन त्याचे गंभीर परिणाम सोसावे लागतात. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या मुलांसमोर इतरांशी कडवट भाषेत बोलत असाल किंवा असभ्य भाषेत बोलत असाल तर ती आताच बंद करा आणि तुमच्या मुलाचे भविष्य चांगले करून घ्या.
खोटं बोलण्याची सवय
खोटे बोलणे ही खुप घाणेरडी सवय आहे. आणि जर या गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांसमोर केल्या तर त्यांच्यावर त्या गोष्टीचा प्नभाव पडू शकतो. कारण तुम्हाला खोटे बोलताना पाहून लहान मुले देखील खोटे बोलू लागतात. त्यामुळे तुमची ही सवय मुलांच्या भविष्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही आजच या सवयी बदला.
हे ही वाचा : Lok sabha Security Breach : सैन्यात भरती होणार होता, पण… कोण आहे अमोल शिंदे?
आदर न करणे
जर आई-वडील घरात एकमेकांचा आदर करत नसतील तर याचा देखील मुलांवर परिणाम होतो. मुले देखील मग कुणाचा आदर करत नाही, आई-वडिलांचा आदर करणे देखील टाळतात. त्यामुळे मुलांसमोर वावरताना एकमेकांचा आदर करा. जर तुम्ही एकमेकांचा आदर कराल तर मुले देखील भविष्यात इतरांचा आदर करतील.
दरम्यान वरील या तीन गोष्टी आहेत, कडवट भाषा, खोटे बोलण्याची सवय आणि आदर करणे. जर या चुका तुम्ही करत असाल, तर आताच सुधरा आणि तुमच्या मुलांचे भविष्य सुंदर करा.
ADVERTISEMENT