Chandrayaan-3 : PM मोदींनी ‘शिवशक्ती पॉइंट’ नाव दिलेलं चंद्रावरचं ‘ते’ ठिकाण नेमकं कोणतं?

रोहिणी ठोंबरे

28 Aug 2023 (अपडेटेड: 28 Aug 2023, 11:05 AM)

ग्रीसच्या दौऱ्यावरून परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑगस्टला सकाळी थेट बंगळुरूला पोहोचले. यानंतर पंतप्रधान इस्रोच्या नेटवर्क कमांड सेंटरमध्ये पोहोचले आणि तेथील शास्त्रज्ञांना भेटले. यावेळी त्यांनी चंद्राच्या ज्या भागावर चांद्रयान-३ चे लँडर उतरले आहे, तो भाग आता ‘शिवशक्ती पॉइंट’ म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा केली.

Mumbaitak
follow google news

PM Narendra Modi Announced Shiva Shakti Point On Moon : ग्रीसच्या दौऱ्यावरून परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑगस्टला सकाळी थेट बंगळुरूला पोहोचले. येथे त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. बंगळुरू विमानतळावर पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘इस्रोच्या शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे.’ यानंतर पंतप्रधान इस्रोच्या नेटवर्क कमांड सेंटरमध्ये पोहोचले आणि तेथील शास्त्रज्ञांना भेटले. यावेळी त्यांनी चंद्राच्या ज्या भागावर चांद्रयान-३ चे लँडर उतरले आहे, तो भाग आता ‘शिवशक्ती पॉइंट’ म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा केली. (Chandrayaan 3 Which place on the moon named Shiva Shakti Point by PM Narendra Modi)

हे वाचलं का?

23 ऑगस्ट रोजी भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाले होते. यानंतर ते ग्रीसच्या दौऱ्यावर गेले. पंतप्रधानांनी बंगळुरूमध्ये आणखी एक घोषणा केली. ते म्हणाले की, ‘चंद्रावरील ज्या ठिकाणी चांद्रयान-2 चे ठसे आहेत ते आता तिरंगा पॉइंट म्हणून ओळखले जाईल.’

Shiv Sena UBT: ‘भाजपच्या पलंगावर गेल्यापासून अजित पवारांना सत्काराचे…’, ‘सामना’तून जहरी टीका

पंतप्रधान मोदींनी याबाबत शास्त्रज्ञांना सांगितलं, ‘हा तिरंगा पॉइंट भारताच्या प्रत्येक प्रयत्नाची प्रेरणा बनेल. हा तिरंगा पॉइंट आपल्याला शिकवेल की कोणतेही अपयश अंतिम नसते. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर यश निश्चितच मिळते.’

‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ केव्हा साजरा केला जाणार?

23 ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर तिरंगा फडकावला होता, तो दिवस आता राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जाईल, असेही पंतप्रधान म्हणाले. ज्या ठिकाणी लँडर उतरले त्या ठिकाणाला शिवशक्ती पॉइंट असे नाव देण्यामागील कारण पंतप्रधानांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी, ‘अंतराळ मोहिमांच्या टचडाउन पॉइंटला नाव देणं ही एक वैज्ञानिक परंपरा आहे. ते म्हणाले की, ‘शिव’मध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे आणि ‘शक्ती’ आपल्याला ते संकल्प पूर्ण करण्याची क्षमता देते.’

World Athletics Championship: नीरज चोप्रा पुन्हा चॅम्पियन! रचला सुवर्ण इतिहास

शास्त्रज्ञांचे कौतुक करत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

‘आपण तिथे गेलो जिथे कोणीही गेलं नव्हतं. आपण तेच केलं जे आधी कोणी केलं नव्हतं. हा आजचा भारत आहे, धाडसी आणि लढणारा. जो नव्या पद्धतीने विचार करतो.’

पीएम मोदींच्या म्हणण्यानुसार, आज संपूर्ण जगाने भारताची वैज्ञानिक ताकद, तंत्रज्ञान स्वीकारलं आहे. चांद्रयान महाअभियान हे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण मानवतेचे यश आहे. या मिशनमध्ये सहभागी असलेल्या महिला शास्त्रज्ञांचे कौतुक करताना ते म्हणाले की, ‘चांद्रयान-3 मध्ये आमच्या महिला वैज्ञानिकांनी, मोठी भूमिका बजावली आहे. चंद्राचा ‘शिवशक्ती’ पॉइंट भारताच्या या वैज्ञानिक आणि तात्विक विचारांचा शतकानुशतके साक्षीदार असेल.’

NCP: राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? 3O सप्टेंबरला फैसला,अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा खुलासा

चांद्रयान-3 लँडिंगवेळी पंतप्रधान मोदी देशात नव्हते. त्यामुळे ते स्वतःला येथे येण्यापासून रोखू शकले नाहीत. त्यामुळेच ते भारतात पोहोचताच प्रथम आपल्या शास्त्रज्ञांना भेटणार असं ठरलं.

    follow whatsapp