Mazi ladki Bahin Yojana: राज्यात लाडकी बहीण योजनेला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील 2.5 कोटींहून अधिक लाभार्थी महिलांच्या खात्यात कमीत कमी 4-5 हफ्त्यांचे पैसे जमा करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दिवाळी बोनसही दिला जाणार असल्याच्या चर्चा आहेत. या माध्यमातून प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा करण्यात येतील, अशी सूत्रांची माहिती आहे. अशातच लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथल्ला यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले रमेश चेन्निथला ?
मुंबईत माध्यमांशी बोलताना रमेश चेन्निथला म्हणाले, "महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार बनवणं आमचं लक्ष्य आहे. आमचं हेच ध्येय समोर ठेऊन काम करणार आहोत. निवडणूक आयोगाकडून (ECI) राज्य सरकारची लाडकी बहीण योजना बंद करण्यात आली आहे. कारण राज्य सरकारकडे पैसे नाहीत. राज्यातील महिलांना सरकारकडून कोणतेच पैसे मिळणार नाहीत. निवडणुकीआधी लाडकी या योजनेबाबत सरकारकडून खोटं सांगण्यात आलं आहे".
हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: महिलांनो! खरंच दिवाळी बोनसचे 5500 मिळणार होते? काय आहे नेमकं सत्य?
परंतु, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अनेक महिला या योजनेपासून वंचित आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार का? असा प्रश्न अनेकांना प्रश्न पडला. याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्टीटरवर माहिती दिली.
हे ही वाचा >> Maharashtra Weather : ऐन दिवाळीत पावसाचा राडा? आज कुठे काय परिस्थिती?
तटकरे यांनी सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून म्हटलं, विरोधी पक्ष लाडकी बहीण योजनेबाबत खोटी माहिती पसरवत आहेत. 4 ते 6 ऑक्टोबर 2024 या कालावधीत 2 कोटी 34 लाख पात्र महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ मिळाला. तसच सर्व पात्र महिलांना डिसेंबरच्या हफ्त्याचे पैसे डिसेंबरमध्येच दिले जातील. महिलांनी या योजनेबाबत कोणत्याही खोट्या माहितीला बळी पडू नका.
ADVERTISEMENT