Screen Time Negative Impact : आजच्या काळात, मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत डिजिटल उपकरणांचा (Digital Device) वापर जीवनाचा एक भाग बनला आहे. स्क्रीन आणि उपकरणांनी आपल्या आयुष्यावर इतका ताबा मिळवला आहे की काही तासही दूर राहिल्यास आपली चलबिचल वाढू लागते. अशा वेळी, स्क्रीन टाइम वाढल्याने मुलांच्या आरोग्यावर कोणते परिणाम होऊ शकतात याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. (Constant screen time can be dangerous for children There will be serious consequences on there Health)
ADVERTISEMENT
विशेषत: या सर्वांचा परिणाम मुलांच्या पोषण आरोग्यावर होत आहे. त्यामुळे मुलांच्या स्क्रीन टाइमची काळजी घेणे त्यांच्या योग्य विकासासाठी महत्त्वाचे आहे.
वाचा : ‘PM मोदींनी रामासाठी उपवास केला, पण…’, उद्धव ठाकरेंनी पुन्हा डिवचलं
खाण्याच्या सवयींवर स्क्रीन टाइमचा प्रभाव
इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मुलं दररोज त्यांचा जास्त वेळ टेलिव्हिजनसमोर घालवतात, ज्यामुळे त्यांच्या खाण्याच्या सवयींवर लक्षणीय परिणाम होतो. असे अनेक अहवाल आहेत जे दर्शवतात की मुलांमध्ये वाढणारा लठ्ठपणा आणि त्यांचा स्क्रीन टाइम यांचा थेट संबंध आहे. दीर्घकाळ टीव्ही पाहणे हे लठ्ठपणाचे कारण बनते.
तसंच स्क्रीनसमोर बसून खाणे हे देखील मुलांच्या खाण्याच्या सवयी बिघडण्याचे एक कारण आहे. कमी शारीरिक हालचाली, हाय कॅलरी स्नॅक्सचे सेवन आणि स्क्रीन टाइममुळे होणारी कमी झोप या प्रकारच्या कारणांमुळे ही समस्या वाढवत आहे. स्क्रीन टाइममुळे स्नॅकिंग वाढू शकते कारण अनेकदा आपण टीव्ही किंवा टॅब पाहताना काहीतरी अस्वास्थ्यकारक खात राहतो.
वाचा : Mumbai Local : तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना लोकलने चिरडले, मृत्यू झालेले कोण होते?
जेवताना लक्ष विचलित होणे
स्क्रिन टाइमचा मुलांवर मानसिक परिणामही होतो. जेवताना स्क्रीन टाइम वाढल्याने मुलांचे खाण्यापासून लक्ष विचलित होते. याचा परिणाम मुलांच्या भूकेवर होतो. अनेक वेळा लक्ष न दिल्याने मुले भुकेपेक्षा जास्त खातात तर कधी अजिबात खात नाहीत. त्यामुळे मुलांनी जेवताना स्क्रीन पाहू नये, जेणेकरून ते काय आणि किती प्रमाणात खातात यावर लक्ष केंद्रित करू शकतील.
वाचा : Uddhav Thackeray : ‘तुमचा राजकीय बाप…’, श्यामा प्रसाद मुखर्जींचं नाव घेत ठाकरेंनी भाजपला सुनावलं
पालक आणि शिक्षकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे की मुलांचे योग्य पोषण सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. यासाठी मुलांचा स्क्रीन टाइम देखील संतुलित ठेवावा लागेल. स्क्रीन टाइम आणि मुलांचे पोषण यांच्यातील संबंध समजून घेणे महत्त्वाचे आहे जेणेकरून मुलांचा योग्य विकास होईल.
ADVERTISEMENT