Weight Loss: सध्याच्या दिवसात अनेक लोकांसाठी लठ्ठपणा (obesity) ही मोठी समस्या बनली आहे. ती समस्या कमी करण्यासाठी कधी डाएटिंग (Dieting) तर कधी जिमचा वापर करतात. तरीही काही जणांच्या बाबतीत ही समस्या काही कमी होत नसते. त्यामुळे तुम्हीही जर लठ्ठपणामुळे त्रस्त असाल आणि वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर मणिपाल रुग्णालयाचे डॉ. रणदीप वधावन (Dr. Randeep Wadhawan) यांनी चार उपाय सांगितले आहेत. त्याचा तुम्ही नक्की वापर करा.
ADVERTISEMENT
डॉ. रणदीप वधावन याबाबत माहिती देताना सांगताना की, सध्याच्या काळात लठ्ठपणा ही समस्या काही फक्त भारतापुरतीच मर्यादित नाही. तर जगभरात ती एक मोठी समस्या बनली आहे. संशोधनानुसार हे सिद्ध झालं आहे की, भारतात लठ्ठपणा आणि वाढलेले वजन ही समस्या एक चिंतेची बाब झाली आहे. मात्र एक गोष्ट चांगली आहे की, काही गोष्टींकडे लक्ष देऊन लठ्ठपणाची समस्या आटोक्यात आणली जाऊ शकते.
तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा
लठ्ठपणाबद्दल डॉ. रणदीप वधावन सांगतात की, वजन कमी करण्यासाठी काही व्यावहारिक गोष्टींकडे लक्ष दिले तर त्याचा निरोगी आरोग्यासाठी नक्कीच फायदा होतो. कोणत्याही व्यक्तीला वजन कमी करण्यासाठी आधी त्याच्या रोजच्या सवयींमध्ये बदल करणे गरजेचे आहे. त्याच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करणे, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधं घेणं हे ही फायदेशीर असते, मात्र कधी कधी त्या औषधांचा वापर होतोच असं नाही. त्यामुळे पुन्हा मग शस्त्रक्रिया वगैरे करण्याची आपत्ती त्या व्यक्तीवर येत असते. त्यामुळे या सगळ्यासाठी तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा असतो.
हे ही वाचा >> Heart Attack : हृदयविकाराचा झटका का येतो? नेमकी त्याची लक्षणं काय? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
1. आहारात बदल-
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे असते. तुम्ही वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारातील कॅलरीज 500-1000 ने कमी केल्या पाहिजेत. वजन कमी करण्यासाठी महिलांनी दररोज 1200-1500 कॅलरीज कमी केल्या पाहिजे तर पुरुषांनी 1500-1800 कॅलरीज कमी केल्या पाहिजेत.
2.रोज व्यायाम
वजन कमी करण्यासाठी व्यायामच महत्वाचा असतो. मात्र रोज करण्यात येणारा व्यायामही त्यासाठी फार गरजेचा असतो. व्यायाम गरजेचा असला तरी तो तुम्ही तुमच्या गरजेनुसारच केला पाहिजे. ही व्यायामाची सुरुवात करताना त्याची सुरुवात तुम्ही तुमच्या वेगाने चालण्यापासून केली पाहिजे. वेगाने चालणे यासारख्या व्यायामाबरोबरच तुम्ही आणखी काही व्यायामाचे प्रकारही वाढवू शकता. वजन कमी करण्यासाठी दररोज 30 ते 60 मिनिटे मध्यम गतीने व्यायाम करणे हा एक महत्वाचा व्यायाम आहे.
फार्माकोथेरपी-
मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीचा बीएमआय 25 kg/m2 पेक्षा जास्त किंवा 27 kg/m2 पेक्षा जास्त असल्यास वजन वाढीबाबत विशेष काळजी घेणे महत्वाचे असते. त्यासाठी तुम्ही औषधोपचारांचा वापर करत असाल तर तेही फायद्याचे ठरत असते, मात्र त्यासाठी काळजी घेण महत्वाचे असते. लठ्ठपणासाठी भारतात औषधांना मंजूरी मिळाली असली तरी त्यासाठी आधी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.
सर्जिकल सोल्यूशन-
जी लोकं लठ्ठपणापासून दीर्घकाळ त्रस्त आहेत, त्यांना त्याचा त्यांच्या आयुष्यात प्रचंड त्रास सहन करावा लागत असतो. ज्या लोकांना 30 kg/m2 पेक्षा जास्त बीएमआय 35 kg/m2 पेक्षा जास्त आहे त्यांना वजन कमी करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र अशा लोकांसाठी बॅरिएट्रिक आणि मेटाबॉलिक थेरपी आहे. त्यामध्येही शस्त्रक्रिया हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. त्यासाठी कॅलरी कमी करुन लहान आतड्यांतील एक अॅनास्टोमोसिस गॅस्ट्रिक बायपास आणि ड्युओडेनल स्विच बायपाससारख्याही गोष्टी केल्या जाऊ शकतात. सध्याच्या काळात लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक या पद्धतीही त्यासाठी उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात.
डॉक्टरांचा सल्ला
लठ्ठपणा नियंत्रित करणे ही निरंतर चालणारी एक प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याकडे कोणत्याही व्यक्तीने विश्वासाने बघितले पाहिजे. वजन कमी करण्याची प्रक्रिया ही निरोगी आयुष्यासाठी फायद्याचीच असते. त्यातच जर लोकांनी खाण्याच्या सवयी आणि व्यायामाला प्राधान्य दिले तर त्याचाही वेगळा फायदा होतो. जर कधी गरज पडली तर त्यासाठी उपचार किंवा शस्त्रक्रिया करून घेतल्यासही त्याचा नक्कीच निरोगी आयुष्याचासाठी फायदा होतो.
ADVERTISEMENT