Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, आता अर्ज झटपट मंजूर होणार

मुंबई तक

• 09:49 PM • 23 Aug 2024

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : लाडकी बहिण योजनेचे आतापर्यंत 31 जुलै पर्यंतचेच अर्ज मंजूर झाले आहेत. 31 जुलै नंतर केलेल्या अर्जाची छाननी आता कुठे सुरु झाली आहे. या अर्जात देखील अनेक महिलांना रिसबमिट करण्याचे पर्याय दिले आहेत.

 ladki bahin yojana scheme ajit pawar ncp maha rashtrwadi helpline for women mukhaymantri majhi ladki bahin yojana scheme ajit pawar

लाडक्या बहिणींना मोठा दिलासा

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार

point

लाडक्या बहिणींचे अर्ज आता झटपट होणार मंजूर

point

लाडक्या बहिणींसाठी हेल्पलाईन सुरू

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अद्याप अनेक महिलांनी घेतला नाही आहे. कागदपत्रांची जुळवाजुवळ, मोबईल नंबरशी आधार लिंक, बँक अकाऊंशी आधार लिंक नसल्या कारणाने हे अर्ज रखडले आहेत. त्यासोबत अर्जाबाबत महिलांमध्ये अजूनही संभ्रम आहेत. हे संभ्रस आता चुटकीसरशी दुर होणार आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. (ladki bahin yojana scheme ajit pawar ncp maha rashtrwadi helpline for women mukhaymantri majhi ladki bahin yojana scheme ajit pawar) 

हे वाचलं का?

लाडकी बहिण योजनेचे आतापर्यंत 31 जुलै पर्यंतचेच अर्ज मंजूर झाले आहेत. 31 जुलै नंतर केलेल्या अर्जाची छाननी आता कुठे सुरु झाली आहे. या अर्जात देखील अनेक महिलांना रिसबमिट करण्याचे पर्याय दिले आहेत. या रिसबमिट प्रोसेसमध्ये काय काय करायचं? त्याचसोबत अर्ज रिजेक्ट झाल्यावर काय करायचं? असे अनेक महिलांच्या मनात आहेत. त्याचसोबत ज्यांनी अद्याप अर्ज केले नाही आहेत? ते देखील संभ्रमात आहेत. त्यामुळे या समस्याच निराकारण करण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने हेल्पलाईन सुरु केली आहे. या हेल्पलाईनने महिलांची योजने संबधीची समस्या दुर होणार आहे.

हे ही वाचा :  Exclusive: 15 दिवसात दोन्ही मुलींवर अनेकदा लैंगिक अत्याचार, प्रचंड हादरवणारा रिपोर्ट मुंबई Tak च्या हाती

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 'महाराष्ट्रवादी' व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरु केली आहे. यामध्ये लाडक्या बहिणींना 9861717171 या क्रमांकाशी संपर्क साधून लाडकी बहीण योजने संदर्भातल्या त्यांच्या समस्या सांगायच्या आहेत. या समस्या सांगितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 72 तासांच्या आत संपर्क केला जाईल आणि तुमच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत. 

या नंबरवर समस्या कशा सांगायच्या? 

  • वरील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा.
  • तुमची भाषा, जिल्हा, मतदारसंघ, लिंग इत्यादी गोष्टी निवडा.
  •  ज्या योजनेची माहिती हवी असेल ती योजना निवडा. 
  • योजनेबद्दल समस्या असल्यास मदत हा पर्याय निवडा. 
  • समस्येनुसार पर्यायाची पुष्टी करा. 
  • यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल.
  • यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याशी संपर्क साधेल.

 महिलांना तक्रार करता येणार? 

माझी लाडकी बहीण योजनेत महिलेच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास महिलांनी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही181 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकतात आणि आपली तक्रार दाखल करू शकतात. महिलांना शक्ती दूत अॅपच्या माध्यमातूनही तक्रार नोंदवता येणार आहे. महिलांना अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार दाखल करता येणार आहे. यानंतरच  त्यांच्या तक्रारीचे निवारण होणार आहे. 

    follow whatsapp