Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यात पैसे जमा व्हायला सूरूवात झाली आहे. बुधवारी 25 जुलैपासून हे पैसे हळूहळु जमा होतं होते.उद्या या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये पार पडणार आहे. या दिवशी देखील महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्याचा शेवटचा दिवस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांना धक्का बसण्याची शक्यता आहे. (ladki bahin yojana scheme last chance to get benefit of 4500 installment amout mukhymantri ladki bahin yojana)
ADVERTISEMENT
ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते. त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी म्हणून 4500 रूपये जमा झाले होते. या योजनेत दरमहा 1500 रूपये दिले जातात. पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 4500 रूपये देण्यात आले होते. आता ऑगस्टपर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता. आता उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना आहे. त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये जमा होणार आहेत.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'त्या' महिलांचे अर्ज मंजूर, पण बँकेत किती पैसे येणार?
मग 3500 कुणाला मिळणार?
ज्या महिलांना 31 जुलैआधी अर्ज भरता आले नव्हते. तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते. अशा महिलांच्या खात्यात हे 4500 जमा होणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे पैसे हे जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात एकही रूपया आला नाही आहे, अशा महिलांच्या खात्यात 4500 जमा होणार आहे.
'या' महिलांना सप्टेंबरमध्येच लाभ
राज्य सरकारने अर्ज करण्यासाठी आता 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पण 1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले होते.
आता ज्या महिलांच्या खात्यात 4500 आणि 1500 रूपये जमा झाले नाही आहेत. त्या महिलांसाठी उद्याची शेवटची तारीख असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर उद्या खात्यात पैसे आले नाही, तर महिलांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana: 4500 खात्यात आलेच नाही...आता पुढे काय करायचं?
'या' महिलांनी घेतला योजनेचा लाभ
''मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला'', अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
''सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा'', असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT