LIC Sakhi Yojana Online Registration: महिलांना दरमहा पैसे मिळणार, अशी करा ऑनलाइन नोंदणी

मुंबई तक

10 Dec 2024 (अपडेटेड: 11 Dec 2024, 03:46 PM)

Bima Sakhi Yojana Online Registration: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी विमा सखी योजनेचा शुभारंभ केला. ही योजना सरकारी मालकीच्या LIC चा उपक्रम आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा त्याचा उद्देश आहे.

महिलांना दरमहा पैसे मिळणार

महिलांना दरमहा पैसे मिळणार

follow google news

बातम्या हायलाइट

point

सरकारी मालकीच्या LIC चा नवा उपक्रम सुरू

point

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला विमा सखी योजनेचा शुभारंभ

point

जाणून घ्या नेमकी काय आहे ही योजना

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी हरियाणातील पानिपत येथे विमा सखी योजनेचा शुभारंभ केला. आयुर्विमा महामंडळाचा हा उपक्रम आहे. विमा क्षेत्रातील नामांकित कंपनींच्या मते, ही योजना 10वी उत्तीर्ण झालेल्या 18-70 वयोगटातील महिलांना सक्षम बनविण्यात मदत करेल. चला या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. येथे आम्ही तुम्हाला या योजनेचे फायदे आणि त्यासाठी नोंदणी कशी करावी याबद्दल सांगणार आहोत. (lic bima sakhi yojana online registration women will get money every month how to register online)

हे वाचलं का?

विमा सखी योजना (Bima Sakhi Yojana)

विमा सखी योजनेंतर्गत, महिलांना आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकता वाढवण्यासाठी पहिली तीन वर्षे विशेष प्रशिक्षण आणि स्टायपेंड दिला जाईल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतात आणि पदवीधर झालेल्या विमा सखींना एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून पात्र होण्याची संधी मिळेल. पंतप्रधान मोदी भावी विमा सखींना नियुक्ती प्रमाणपत्रांचेही वाटप करणार आहेत. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना वयाचा पुरावा, शैक्षणिक पात्रता आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल.

हे ही वाचा>> Maharashtra Cabinet Expansion : CM फडणवीसांना 'हे' 7 नेते नकोच?, यांच्या मंत्रिपदाचं काही खरं नाही...

विमा सखी योजना ऑनलाइन: पात्रता (Bima Sakhi Yojana Online)

किमान १८ वर्षे आणि कमाल ७० वर्षे वयाच्या महिला या योजनेसाठी पात्र असतील. संभाव्य उमेदवारांची किमान 10 वी पास ही पात्रता देखील असावी. विद्यमान एजंट आणि कर्मचाऱ्यांचे नातेवाईक या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येत नाही.

स्टायपेंड किती असेल?

महिलांना पहिल्या वर्षासाठी 48,000 रुपये (बोनस वगळून) कमिशन मिळेल. उमेदवारांना 7,000 रुपये मासिक वेतन देखील मिळेल, जे दुसऱ्या वर्षापासून 6,000 रुपये होईल. दुसऱ्या वर्षी सारख्याच अटींच्या अधीन राहून हे 5,000 रुपयांपर्यंत कमी होईल.

हे ही वाचा>> Durgadi Fort वर मशीद नाही मंदिरच, 48 वर्षांनंतर कोर्टाचा निकाल.. वक्फची मागणीही फेटाळली!

विमा सखी योजना ऑनलाईन नोंदणी

ही योजना 9 डिसेंबर 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत वेबसाइट https://licindia.in/test2 वर जावे लागेल. इथे जाऊन 'Click here for Bima Sakhi' वर क्लिक करा. त्यानंतर पेज ओपन झाल्यावर तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पत्ता यासारखी माहिती द्यावी लागेल.

    follow whatsapp