LIC Bima Sakhi Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी 9 डिसेंबरला हरियाणाच्या पानीपतमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या विमा सखी योजनेची घोषणा केली. ही योजना सुरु करतानाच मोदी म्हणाले, भारत महिला सशक्तीकरणसाठी सतत पावलं उचलत आहे. आमच्या सरकारने मागील दहा वर्षात महिला सशक्तीकरणासाठी अभूतपूर्व निर्णय घेतले आहेत. आज हरियाणाच्या पानीपतमध्ये विमा सखी योजनेचा शुभारंभ करून अत्यंत आनंद होत आहे.
पीएम मोदींनी विमा सखी योजना सुरु करतानाच काही महिलांना नियुक्ती पत्रही दिले. या योजनेच्या माध्यमातून महिलांना एलआयसी एजेंट बनण्याची ट्रेनिंग दिली जाणार आहे. याचदरम्यान त्यांना प्रत्येक महिन्याला 5 ते 7 हजार रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय कमिशनही दिला जाईल.
ADVERTISEMENT
कोण करू शकतो अर्ज?
विमा सखी योजना फक्त महिलांसाठी आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कमीत कमी दहावी उत्तीर्ण झालेलं प्रमाणपत्र अनिवार्य आहे. यामध्ये 18 ते 70 वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
हे ही वाचा >. Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी, 'त्या' पत्रात नेमकं काय म्हटलंय?
एलआयसी एजंट ते डेव्हलोपमेंट ऑफिसर बनण्याची संधी
ट्रेनिंगनंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतात आणि पदवीधर विमा सख्यांना (महिलांना) एलआयसीमध्ये डेव्हलोपमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी मिळेल.
3 वर्षांसाठी स्पेशल ट्रेनिंग
या योजनेच्या माध्यमातून फायनेंशियल लिटरेसी आणि विमा जागरुकता वाढवण्यासाठी महिलांना आधी 3 वर्षांसाठी स्पेशल ट्रेनिंग आणि आर्थिक सहाय्य दिलं जाईल. या योजनेच्या सुरुवातीला महिलांना दरमहा 7000 रुपये दिले जाणार आहेत. तर दुसऱ्या वर्षी ही रक्कम 6000 केली जाणार आहे. तर तिसऱ्या वर्षी ही रक्कम 5000 रुपये असणार आहे. याप्रमाणे महिलांना पहिल्या वर्षी 84 हजार रुपये, दुसऱ्या वर्षी 72 हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी 60 हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय विमा सख्यांना (महिलांना) वेगळं कमिशनही दिलं जाणार आहे.
हे ही वाचा >> Abhishek-Aishwarya Divorce : अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम, 'त्या' लग्नसोहळ्यात एकत्रित झाले स्पॉट
ADVERTISEMENT