ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन, दहीहंडी अन् सुट्टी... पाहा संपूर्ण सणांची यादी

मुंबई तक

29 Jul 2024 (अपडेटेड: 29 Jul 2024, 08:05 PM)

August Month Festival List: धार्मिक दृष्टिकोनातून पाहता संपूर्ण ऑगस्ट महिना हा उपवास आणि सणांनी भरलेला असतो, ज्यामध्ये श्रावण, नागपंचमी, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, असे अनेक महत्त्वाचे सण येतात.

ऑगस्ट महिन्यातील संपूर्ण सणांची यादी

ऑगस्ट महिन्यातील संपूर्ण सणांची यादी

follow google news

बातम्या हायलाइट

point

पाहा ऑगस्ट महिन्यात कोणकोणते सण

point

रक्षाबंधन आणि दहीहंडसह नेमके कोणते सण आहेत ऑगस्ट महिन्यात?

point

पाहा ऑगस्ट महिन्यात किती सुट्ट्या असणार

August Month Festival: मुंबई: जुलै महिन्याला काही दिवस उरले असून आता ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. हिंदू धर्मात  वर्षातील 12 महिन्यांचे स्वतःचे महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात वेगवेगळे उपवास आणि सण असतात. त्याचबरोबर येत्या ऑगस्ट महिन्यात अनेक महत्त्वाचे सण आहेत. धार्मिक दृष्टिकोनातून पाहता संपूर्ण ऑगस्ट महिना हा उपवास आणि सणांनी भरलेला असतो, त्यात श्रावण, नागपंचमी, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी हे अनेक महत्त्वाचे सण येतात. (which festivals are coming in the month of august and when see the list of fasting days including rakshabandhan krishna janmashtami dahihandi)

हे वाचलं का?

ऑगस्ट 2024 मधील महत्त्वाचे सण आणि दिवस 

• 5 ऑगस्ट, सोमवार - श्रावणाला सुरुवात (पहिला श्रावणी सोमवार)

• 6 ऑगस्ट, मंगळवार – मंगळागौरी पूजन

• 8 ऑगस्ट, गुरुवार – विनायक चतुर्थी

• 9 ऑगस्ट, शुक्रवार – नागपंचमी

हे ही वाचा>>Ganesh Chaturthi 2024: यंदा कधी आहे गणेश चतुर्थी? जाणून घ्या तिथी, पूजेचा मुहूर्त

• 12 ऑगस्ट, सोमवार – दुसरा श्रावणी सोमवार

• 15 ऑगस्ट, शुक्रवार – पुत्रदा एकादशी, स्वातंत्र्य दिन

• 19 ऑगस्ट, सोमवार – नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, तिसरा श्रावणी सोमवार व्रत,  (रक्षा बंधन – हिंदू दिनदर्शिकेनुसार, श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला राखी बांधली जाते, या दिवशी बहिणी त्यांच्या भावाच्या मनगटावर पवित्र रक्षासूत्र बांधतात. भाऊ प्रत्येक संकटात आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो.)

• 22 ऑगस्ट, गुरुवार - संकष्ट गणेश चतुर्थी (या दिवशी भगवान गणेशाची पूजा विधीपूर्वक केली जाते.)

• 25 ऑगस्ट, रविवार – हळषष्ठी व्रत (भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या सहाव्या दिवशी हळषष्ठी व्रत पूजा केली जाते, कारण या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलराम यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. मुलाचे उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धीची कामना करण्यासाठी हे व्रत केले जाते.)

हे ही वाचा>> Ganesh Chaturthi 2024: बाप्पा मोरया..  गणपती बाप्पाच्या पुजेचा 'हा' आहे मुहूर्त!

• 26 ऑगस्ट, सोमवार – जन्माष्टमी (कृष्ण जन्माष्टमी दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते)

• 27 ऑगस्ट, मंगळवार - गोपाळकाला, दहीहंडी

• 29 ऑगस्ट, गुरुवार – अजा एकादशी

• 31 ऑगस्ट, शनिवार – प्रदोष व्रत

    follow whatsapp