Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: लेकासह सगळेच उमेदवार पडले, राज ठाकरे तीनच शब्दात व्यक्त झाले..

मुंबई तक

23 Nov 2024 (अपडेटेड: 23 Nov 2024, 06:50 PM)

Maharashtra Election Result 2024 LIVE Updates: राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? हा एकच सवाल सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. अशातच आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेशी संवाद साधला.

Mumbaitak
follow google news

LIVE Maharashtra Assembly Election Results: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024:  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान हे 20 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलं होतं. संपूर्ण राज्यात 66.05 टक्के एवढं मतदान झालं होतं. ज्यानंतर आज (23 नोव्हेंबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहेत. सध्या समोर आलेल्या कलांनुसार राज्यात महायुती आघाडीवर दिसते आहे. 100 पेक्षा जास्त जागांवर आता महायुती पुढे आल्याचं दिसतंय. 

सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील काही तासातच राज्याचा नेमका निकाल काय हे स्पष्ट होईल. यंदाच्या निवडणुकीत नेमकं कोणाला बहुमत मिळेल याबाबत बराच संभ्रम असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी राज्यातील जनतेने नेमका कोणाला कौल दिला आहे याकडेच आता सगळंचे डोळे लागून राहिले आहे.

 

हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election Results 2024 : Maharashtra Elections Exit Poll : कोणत्या मतदारसंघात कुणाचा विजय? अख्खी यादी आली समोर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचे क्षणाक्षणाचे संपूर्ण अपडेट आपल्याला या लाइव्ह ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील. 

हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election Results 2024 : राज्यात महायुतीचा झेंडा फडकणार! MVA ला फक्त 'इतक्या' जागा मिळणार, 'Chanakya Exit Poll'ने उडवली खळबळ

याशिवाय प्रत्येक मतदारसंघातील निकाल आणि इतर सगळ्या घडामोडी Mumbaitak.in या आमच्या वेबसाइटवर तुम्हाला मिळतील.

Amit Thackeray | Nawab Malik | Aditya Thackeray | Varun Sardesai | Mumbai Assembly Election


 

  • 06:48 PM • 23 Nov 2024
    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : लेकासह सगळेच उमेदवार पडले, राज ठाकरे तीनच शब्दात व्यक्त झाले..

    राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या तीन शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.  दादर-माहिम विधानसभा मतदारसंघ हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. इथे अमित ठाकरे यांना दिलेली उमेदवारी या चर्चेचं कारण होती. मात्र आता अमित ठाकरेंचा संभाव्य पराभव चर्चेचं कारण होऊ शकतो. यावेळी राज ठाकरे यांनी घेतलेला हा निर्णय चुकला का अशीही चर्चा होते आहे. कारण राज ठाकरे यांनी स्वत: सांगितलं होतं की, काही लोकांनी अमित ठाकरे यांना भांडूपमधून उमेदवारी द्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती. 

    माहिममध्ये उद्धव ठाकरेंचे उमेदवार महेश सावंत विजयी झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा विजय एका अंगाने महत्वाचा असणार आहे. कारण इथे अप्रत्यक्षपणे त्यांचा लढा हा अमित ठाकरे आणि पर्यायाने राज ठाकरे यांच्याशी होता. त्यामुळे आता राज ठाकरे अमित ठाकरेंच्या माहिममधील पराभवानंतर ही प्रतिक्रिया दिल्यानं पुन्हा एकदा चर्चा होते आहे. 

  • 06:41 PM • 23 Nov 2024
    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : "मुख्यमंत्रीपदाबद्दल आताच भाष्य करणं योग्य नाही..."
    • निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन
    • भाजपचा स्ट्राईक रेट सर्वाधिक आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचं अभिनंदन
    • लोकांना पंतप्रधान मोदींचे काम आवडले आहे. या निवडणुकीने अनेक वादांनाही जन्म दिला आहे.
    • एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना हार्दिक शुभेच्छा, सर्व विजयी आमदारांचे अभिनंदन.
    • मुख्यमंत्री कोण होणार? यावर आताच काही भाष्य करणं योग्य होणार नाही. मुख्यमंत्री कोण होणार हे पक्षनेतृत्व आणि आमदार मिळून ठरवतील.
    • आमचं सरकार येईल असा विश्वास होता लोकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. चांगले काम करायचे आहे..
    • संघ ही राजकीय संघटना नाही. स्वयंसेवकांनी लोकांना फक्त मतदान करण्याचं आवाहन केलं होतं.
    • जनतेनं जातीचं राजकारण नाकारलं.
    • 'बटेंगे तो कटेंगे' हा भाजपचा मुद्दा नव्हता, लाडकी बहीन योजना आणि आमच्या कामामुळे आम्हाला विजय मिळाला.
    • जात-पात, धर्म, भाषा यांच्या वादात न अडकता लोकांनी मतदान केलं.
  • 06:19 PM • 23 Nov 2024
    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : आता अस्सल भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
    1. विधानसभेचा निकाल अनाकलनीय.
    2. पटला नाही तर निकाल लागलेला आहे.
    3. मविआला मत देणाऱ्यांचे धन्यवाद.
    4. लाटेपेक्षा त्सुनामी आली असं वातावरण दिसतंय.
    5. पण हा निकाल जनतेला पटला की नाही हे महत्वाचं आहे.
    6. विरोधी पक्षच शिल्लक ठेवायचा नाही असं चित्र आहे.
    7. एकच नेशन, वन इलेक्शन आणि वन पार्टीच्या दिशेने प्रवास.
    8. समस्यांचा पाढा वाचत यासाठीच जनतेने महायुतीला मतं दिली का असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शंका उपस्थित केली.
    9. काहीजण म्हणतायत की इव्हीएमचा विजय, तर असू शकतं.
    10.  पण जनतेला निर्णय मान्य असेल तर काही बोलू नये.
    11. आम्ही प्रामाणिकपणे वागलो हे चुकलो की काय असं वाटतंय.
    12. त्यांचं अभिनंदन, निवडणूक आयोगाने स्थिगिती दिलेली लाडकी बहीण 2100 रुपयांनी सुरू करतील, कर्जमाफी करतील अशी मागणी.
    13. अस्सल भाजपचा मुख्यमंत्री होईल अशी आशा
  • 05:47 PM • 23 Nov 2024
    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : शिवसेनेची वर्षा बंगल्यावर बैठक, मुख्यमंत्रीपदावर चर्चा?

    शिवसेना पक्ष कार्यकारीणीची वर्षा बंगल्यावर बैठक संपन्न झाली असून,  एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव कार्यकारीणीने मंजुर केला आहे. कार्यकारीणीने एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्याकरिता व मित्र पक्षांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेण्याकरिता सर्वाधिकार दिले. तसेच विधीमंडळातील शिवसेना गटनेते, प्रतोद आणि इतर महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे सर्व अधिकार कार्यकारीणीने एकनाथजी शिंदे यांना दिलेले आहेत.

  • 05:39 PM • 23 Nov 2024
    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : लातूर, बुलढाणा ते अमरावती... कोण कोण जिंकलं?
    1. लातूर शहर - 7889 मतांनी काँग्रेसचे अमित देशमुख विजयी.
    2. निलंगा मतदारसंघ - भारतीय जनता पार्टीचे संभाजी पाटील 13831 मतांनी विजयी. 
    3. अहमदपूर मतदारसंघ - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील 31685 मतांनी विजयी
    4. औसा मतदारसंघ  - भारतीय जनता पार्टीचे अभिमन्यू पवार 33268 मतांनी विजयी
    5. उदगीर मतदारसंघ - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे संजय बनसोडे 92061 मतांनी विजयी.
    6. लातूर ग्रामीण मतदारसंघ - भारतीय जनता पार्टीचे रमेश कराड 667 मतांनी विजयी..
    7.  किशोर जोरगेवार 22,883 मतांनी विजयी
    8. वर्धा - भाजपाचे राजेश बकाने यांचा दणदणीत विजय
    9.  प्रवीण दटके 11, 516  मतांनी विजयी
    10. साकोली - नाना पटोले 529 मतांनी विजयी
    11. बुलढाणा - संजय गायकवाड विजयी
    12. इंदापूर - दत्ता भरणे विजयी
    13. अमरावती  - रवी राणा विजयी
    14. अहेरी - धर्मराव बाबा विजयी
    15. भोकरदन - संतोष दानवे विजयी
    16. बदनापूर - नारायण कुचे विजयी
    17. परतूर - बबनराव लोणीकर विजयी
    18. घनसावंगीतून - हिकमत उढाण विजयी
    19. जालना - अर्जुन खोतकर विजयी
  • 05:37 PM • 23 Nov 2024
    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : "कदाचित जनतेच्य मनात...",

    "माहिम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे…आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो. गेली अनेक वर्षे या प्रभागातील अगदीच बेसिक गरजांसाठी लोकांचा संघर्ष बघितला. याच संघर्षातून उभ्या राहिलेल्या विचारांनी, प्रभागाच्या विकासासाठी आणि बदलासाठी आपण एक नवा अध्याय लिहावा, केवळ या हेतूने मी या निवडणुकीत उतरलो होतो. मात्र, कदाचित येथील जनतेच्या मनात काही वेगळे असावे. हा कौल मला हेच शिकवतोय की, अजून खूप काम करायचं आहे. अजून मेहनत घ्यायची आहे. अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आपला विश्वास मिळवण्यासाठी अजून झटायचं आहे. माझी ही लढाई कधीच राजकीय सत्ता मिळवण्यासाठी नव्हती… कारण ही लढाई कोणा राजपुत्राची नसून, ती होती एका सामान्य कार्यकर्त्याची - जो सर्वांसाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतो. मला फक्त आपल्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणायचं होतं. आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; एक नवी सुरुवात आहे. तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी, माहिम, दादर, प्रभादेवी आणि सबंध महाराष्ट्राच्या विकासासाठी, मी २४ तास झटत राहीन, हा माझा शब्द आहे. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला मतदान केलं, त्यांचे मनापासून आभार. तुमचा विश्वास वाया जाणार नाही. मी वचन देतो - तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन… कारण माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रितपणे नक्की जिंकू!" असं म्हणत अमित ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

  • 04:08 PM • 23 Nov 2024
    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : विजयानंतर पहिली पत्रकार परिषद, काय म्हणाले शिंदे?

    "महाराष्ट्रातला हा ऐतिहासिक दिवस आणि विजय आहे. आतापर्यंतच्या अनेक निवडणुका आपण पाहिल्या. पण ही निवडणूक लोकांनी लोकांच्या हातात घेतली, अशाप्रकारची होती. लोकांनी मतांचा प्रेमाचा वर्षाव महायुतीवर केला. कारण लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, या सर्व घटकांनी यावेळी महायुतीवर प्रेम दाखवलं. मी सर्व मतदारांना मनापासून धन्यवाद देतो. या ऐतिहासिक विजयासीठी साष्टांग दंडवत घालतो, अशाप्रकारचं काम मतदारांनी केलं आहे. आम्ही जे निर्णय घेतले, ते आतापर्यंतचे न भुतो न भविष्यतो आहे. महाविकास आघाडीने आतापर्यंत जे स्पीडब्रेकर टाकले होते, ते स्टे आम्ही सर्व काढले. कामं सुरु झाली. त्यानंतर अटल सेतू, कोस्टल, मेट्रो, कारशेडही झालं. कामाला आम्ही प्राथमिकता दिली."
     

  • 03:48 PM • 23 Nov 2024
    Balasaheb Thorat : शिंदेंचा शिलेदार, विखेंची फिल्डिंग... बाळासाहेब थोरात यांची विकेट

    बाळासाहेब थोरात यांचं आतापर्यंत संगमनेर मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व होतं. पण एकनाथ शिंदे यांचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्या गडाला सुरूंग लावला आहे. त्यामुळे अमोल खताळ हे जायंट किलर ठरले आहेत.  बाळासाहेब थोरात हे नवव्या वेळेस यंदा विधानसभा निवडणुकीला सामोरं जात होते. तर त्यांच्या विरोधात असलेले अमोल खताळ हे एक नवखे तरुण म्हणून त्यांच्यासमोर होते. अमोल खताळ यांच्या विजयाची कारणं जाणून घेताना विखेंबद्दलही बोलणं अपरिहार्य ठरतं. कारण अमोल खताळ यांच्या विजयासाठी राधाकृष्ण विखे यांनी मोठी ताकद लावून मायक्रो प्लॅनिंग केल्याचं दिसलं होतं. त्यामुळे या परभवात पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे विखे विरुद्ध थोरात असा लढा पाहायला मिळाला.

  • 02:10 PM • 23 Nov 2024
    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : गुलाबी प्रचारानंतर विजयाचा गुलाल, अजितदादांना गुलाबी बुके देणारैा कोेण?

    अजित पवार यांनी राष्ट्रवादीला मिळालेल्या यशानंतर आपल्या एस्क हँडलवर खास फोटो शेअर करत महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला असं म्हटलं आहे. त्यांच्या या यशस्वी प्रचाराच्या मागे असलेले नरेश अरोरा हे देखील या फोटोमध्ये दिसत आहेत. (Naresh Arora meets Ajit Pawar)

  • 02:02 PM • 23 Nov 2024
    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : महायुतीचे राजू नवघरे मतांनी 26353आघाडीवर

    ​​​​​​​Maharashtra Election Results 2024 LIVE Updates

    • 22 व्या फेरीच्या अखेर महायुतीचे राजू नवघरे मतांनी 26,353 आघाडीवर
    • महायुतीचे राजू नवघरे यांना 99,218 मतं 
    • महाविकास आघाडीचे जयप्रकाश दांडेगावकर 72865 मते. 
    • राजू घरे हे विजयाच्या जवळ
  • 01:53 PM • 23 Nov 2024
    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे हादरे

    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला असून, कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणही आता पराभवाच्या उंबरठ्यावर असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता महाराष्ट्र काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. राज्याच्या इतिहासात यंदाचा भाजपचा विजय हा अत्यंत मोठा विजय म्हणून पाहिला जाऊ शकतो.

  • 01:41 PM • 23 Nov 2024
    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : आता लक्ष मुख्यमंत्रीपदावर, बहुमत मिळाल्यावर शिंदे काय म्हणाले?

    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले,  "मी महाराष्ट्रातल्या मतदारांचे आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो. त्यांचं अभिनंदन करतो. महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळतंय. लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, लाडके भाऊ, या समाजातील प्रत्येक घटकाने महायुतीला भरभरून मतदान केलं. गेले अडीच वर्ष या काळात महायुतीने जे काम केलं, त्या कामाची पोचपावती या निवडणुकीत आम्हाला मिळाली. आम्ही सर्वसामान्यांचा सरकार म्हणतो. सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काय करू शकतं, हे आम्ही अनेक योजनांच्या आणि विकासाच्या माध्यमातून दाखवून दिलं. सरकारची प्रामाणिक इच्छा असेल, तर अशाप्रकारच्या योजना सुरु करु शकते. म्हणूनच सर्वसामान्यांच्या भल्यासाठी हे सरकार आलं आहे.

     

  • 12:38 PM • 23 Nov 2024
    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates:शिंदेंच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा?

    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 58 उमेदवार सध्याआघाडीवर असून, काही उमेदवारांच्या फक्त विजयाची घोषणा होणे बाकी आहे. त्यामुळे आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यावर सर्वांचं लक्ष लागून आहे. कारण दुसरीकडे भाजपलाही तब्बल 120 पेक्षा जास्त उमेदवारांनी विजयी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदावरुन महायुतीमध्ये रस्सीखेच होणार काय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

  • 12:10 PM • 23 Nov 2024
    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: विजयानंतर जल्लोष, श्रीकांत शिंदे मुख्यमंत्रीपदाबद्दल काय म्हणाले?



    लाडकी बहीन योजनेनं चमत्कार घडवला. आमच्या विकासाच्या मुद्द्याला जनादेश देऊन जनेते खोटारडेपणाला नाकारलं आहे अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार कोण हे आज जनतेने दाखवून दिलं आहे. त्यामुळे आता खरी शिवसेना कोण, हे पुढच्या वेळी कुणी विचारू नये असा टोलाही श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे. तुम्ही पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्याला विचारा, प्रत्येकजण म्हणेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत. सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील असा विश्वासही श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

  • 12:02 PM • 23 Nov 2024
    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: नागपूरमध्ये नितीन राऊत 4 हजार मतांनी आघाडीवर, फडणवीसांचा...

    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates

     

    १. नागपूर दक्षिण पश्चिम
     देवेंद्र फडणवीस 12,329 मतांनी आगाडीवर(विजयी)

    २. मध्य नागपूर 
     प्रवीण दटके 2952 मतांनी आघाडीवर

    ३. पश्चिम नागपूर 
    विकास ठाकरे 4600 मतांनी आघाडीवर

    4:  उत्तर नागपूर
     नितीन राऊत 4600 मतांनी आघाडीवर

    ५. दक्षिण नागपुर 
     मोहन मते 9030 मतांनी आघाडीवर

    ६. पूर्व नागपूर 
     कृष्णा खोपडे 6020 मतांनी आघाडीवर

  • 11:49 AM • 23 Nov 2024
    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: "देवेंद्रजी, देवेंद्रजी आणि देवेंद्र...", चित्रा वाघ यांचा जल्लोष

    Maharashtra Assembly Election 2024 Result LIVE: "देवेंद्र जी ….देवेंद्रजी आणि देवेंद्र जी… चप्पा चप्पा भाजपा…. माझ्या राज्यातील सगळ्या लाडक्या बहीणीचें आभार…आभार ..आभार" असं म्हणत चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या लाभार्थींचे आभार मानले आणि महायुतीला मिळालेल्या विजयानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

  • 11:36 AM • 23 Nov 2024
    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: नागपूर दक्षिण पश्चिममधून फडणवीस विजयी

    Maharashtra Assembly Election 2024 Result LIVE: नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस हे विजयी झाल्याची माहिती समोर आलेली आहे. गिरीश महाजन यांच्यानंतर हा राज्यातला दुसरा निकाल असणार आहे. त्यामुळे एकीकडे भाजप महायुतीला राज्यात यश मिळत असताना त्यांना मिळालेलं हे यश भाजपसाठी जल्लोषाचं कारण ठरणार आहे. 

  • 11:33 AM • 23 Nov 2024
    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates:गिरीश महाजन जामनेरमधून विजयी, राज्यातला पहिला निकाल

    ​​​​​​​Maharashtra Election Results 2024 LIVE Updates

    • गिरीश महाजन जामनेरमधून विजयी, राज्यातला पहिला निकाल
    • बारामतीमध्ये अजित पवार 15000 मतांनी आघाडीवर
    • श्रीवर्धन आदिती तटकरेकर्जत जामखेडमध्ये रोहित पवार आघाडीवर
  • 11:21 AM • 23 Nov 2024
    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: बारामतीत अजितदादांच्या समर्थकांचा जल्लोष

    Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE: निवडणूक आयोगाच्या अधिकृत ट्रेंडनुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री बारामती विधानसभेतील राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार 15,382 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडत जल्लोष सुरू केला आहे. दरम्यान, महायुतीने राज्यात 145 जागांचा बहुमताचा आकडा पार केला आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार महायुतीमध्ये भाजपला 118, शिवसेनाला 56, राष्ट्रवादीला 37 जागांवर आघाडीचं मतदान आहे. 

  • 11:15 AM • 23 Nov 2024
    Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: संभाजीनगरमध्ये शिंदेंचे उमेदवार आघाडीवर, वाचा यादी

    Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE

    संभाजीनगर पश्चिम : ९ वी फेरी-संजय शिरसाट यांची ९ हजार २८६ मतांची आघाडी
    कन्नड : 8 वी फेरी- संजना जाधव 8418 मतांनी पुढे
    गंगापूर : 11 वी फेरी- सतीश चव्हाण ४८३ मतांनी आघाडीवर
    संभाजीनगर मध्य : जैस्वाल दुसऱ्या फेरी अखेर 3342 मतांनी आघाडीवर
    फुलंब्री : अनुराधा चव्हाण पाचव्या फेरीत 11721 मतांची आघाडी
    परळी : धनंजय मुंडे 50 हजार मतांनी आघाडीवर
    गंगाखेड : विशाल कदम (शिवसेना उबाठा) आघाडी:- 8932
    घनसावंगी : 2 फेरी हिकमत उढाण २ हजारांनी आघाडीवर...
    वैजापूर :12 वी फेरी रमेश बोरनारे 22,000 हजार मतांनी आघाडीवर..
    सिल्लोड : अब्दुल सत्तार ७ वी फेरीनंतर ३७०५ आघाडी
    औसा : 5 वी फेरी अभिमन्यू पवार 9580 मतांनी आघाडीवर
    जालना : अर्जुन खोतकर चौथ्या फेरी अखेर 9 हजार 157 मतांनी आघाडीवर
    भूम-परांडा : तानाजी सावंत 69 आघाडी
    भोकरदन : संतोष दानवे 3278 मतांनी आघाडीवर
    बदनापूर : भाजपाचे नारायण कुचे 10 हजार 86 मतांनी पुढे
    औरंगाबाद पूर्व : 7 फेरी जलीलांची 47 हजार 649 आघाडी
    लातूर शहर : 6 फेरी अर्चना पाटील चाकूरकर 460 मताने आघाडीवर

follow whatsapp