Maharashtra Assembly Election 2024 Live : "सरकार बनवण्यासाठी कुणाची गरज...", निकालाआधीच चंद्रकांतदादा पाटील यांचं मोठं विधान

मुंबई तक

22 Nov 2024 (अपडेटेड: 22 Nov 2024, 09:44 PM)

Maharashtra Assembly Elections 2024 Live : राज्याच्या विधानसभा निवडणुकांवर सध्या देशाचं लक्ष लागून आहे. उद्या जाहीर होणाऱ्या या निकालांच्या माध्यमातून राज्यातील पुढच्या पाच वर्षांसाठी कुणाचं सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे.

Chandrakant Patil On Maharashtra Election Result

Chandrakant Patil On Maharashtra Election Result

follow google news

Maharashtra Assembly Elections 2024 LIVE Updates: राज्यातील विधानसभा निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं असून, उद्या निकाल जाहीर होणार आहेत. मतदानानंतर वेगवेगळे एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यामुळे कोणत्या एक्झिट पोलचा नेमका अंदाज खरा ठरणार यावर चर्चा सुरू आहेत. मात्र त्यातच आता उद्या निकाल लागण्यापूर्वीच सर्व बड्या पक्षांनी मुंबईत तयारी सुरू केल्याचं दिसतंय.

महाराष्ट्रातील यंदाची निवडणूक काही कारणांमुळे विशेष ठरली. कारण पहिल्यांदाच प्रमुख सहा पक्ष विधानसभेच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे आता बहुमत कुणाला मिळणार? मुख्यमंत्री कोण होणार? यावर सर्वांचं लक्ष आहे. याबद्दलच्या सर्व अपडेट्स या लाईव्हमध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. 

लाइव्हब्लॉग बंद

  • 04:09 PM • 22 Nov 2024
    Chandrakant Patil : महायुती किती जागा जिंकणार? चंद्रकांतदादा पाटील यांनी केला मोठा दावा, म्हणाले...

    राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या शनिवारी 23 नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी, महायुती आणि महाविकास आघाडीकडून सरकार स्थापनेचा दावा केला जात आहे. अशातच भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. महायुतीचं सरकार येणार आहे. युतीचे 160 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील. सरकार बनवण्यासाठी कुणाची गरज नाही. जे जे येतील त्यांचे स्वागतच आहे, असं चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. 

  • 12:20 PM • 22 Nov 2024
    Manoj Jarange: सरकार स्थापन झाल्यानंतर मनोज जरांगे काय भूमिका घेणार?

    सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिलीय. राज्यातले मराठे अंतरवाली सराटीत येणार आणि सामूहिक आमरण उपोषण होणार असं जरांगे म्हणालेत. देशात कधी इतकं मोठं आमरण उपोषण झालं नसेल, तितकं मोठं उपोषण अंतरवाली मध्ये होणार असल्याचं जरांगे म्हणालेत. एका ठिकाणी, एका जागेवर आणि एकाच वेळास हे सामूहिक आमरण उपोषण होणार असल्याची माहिती मनोज जरांगेंनी माध्यमांशी बोलतांना दिलीय. सरकार कोणाचं ही येऊ द्या, मराठे उपोषणाला बसले की सरकार गुढग्यावर टेकवलं म्हणून समजायचं असा इशारा देखील जरांगे यांनी दिलाय

  • 11:16 AM • 22 Nov 2024
    Sanjay Raut On Maharashtra Election : सर्व्हेवर माझा अजिबात विश्वास नाही, राऊत म्हणाले...

    सर्व्हे करणारे पेड लोक असतात. आम्ही त्यावर विश्वास ठेवत नाही. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला 5 जागा मिळणार नाहीत, असं सांगितलं. पण 40 जागा जिंकले. मोदींना 400 जागा मिळणार असं बोलले. बहुमत सुद्धा मिळालं नाही. लोकसभेला महाविकास आघाडीला दहा जागाही मिळणार नाहीत, असं म्हणाले. 31 जागा जिंकलो. आम्ही महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकू. आम्ही काल सर्वजण एकत्र बसलो. महाराष्ट्रातील मतदारांचा कौल यांसदर्भात मी जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई आम्ही सर्व बसलो होतो.

  • 10:18 AM • 22 Nov 2024
    Maharashtra Elections 2024 : महायुती किंवा मविआला पाठिंबा देण्याची वेळ आल्यास आम्ही... काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? \

    "जर उद्या वंचित बहुजन आघाडीला ठराविक आकडा मिळाला आणि महायुती किंवा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची वेळ आली, तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ जे सरकार स्थापन करु शकतील", असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

  • 09:07 AM • 22 Nov 2024
    मुंबईत मोठ्या हालचाली, मविआची बैठक, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला?

    वेगवेगळ्या एक्झिट पोलनुसार राज्यात समोर आलेल्या वेगवेगळ्या  महायुतीचं सरकार येईल किंवा अटीतटीची परिस्थिती निर्माण होऊन अपक्ष किंगमेकर ठरू शकतील. त्यामुळे घोडेबाजार टाळण्यासाठीही सर्वांचं लक्ष सर्व आमदारांवर असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यासाठीची तयारी सुरू झाली असून, मुंबईतल्या हॉटेलही त्यासाठी बूक केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत काल महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री कोण असेल यावर चर्चा झाल्याचं कळतंय. ते नाव अजून कळू शकलेलं नसलं तरी, बाहेर येताना मविआचे नेते एकाच कारमध्ये आले. त्यावेळी जयंत पाटील यांच्या हातात कारचं स्टिअरींग होतं. या फोटोची चांगलीच चर्चा होते आहे. तसंच बाहेरच्या राज्यातून काँग्रेसचा एक बडा नेता महाराष्ट्रात येणार असून, त्यांच्याकडेच सर्व जबाबदारी असणार असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे 26 तारखेपर्यंत होणाऱ्या घडामोडींवर देशाचं लक्ष असणार आहे. 

follow whatsapp