Maharashtra Exit Poll: राज्यात येणार MVA चं सरकार! शिंदे-भाजपला बसणार दणका

मुंबई तक

20 Nov 2024 (अपडेटेड: 20 Nov 2024, 08:57 PM)

Maharashtra Election 2024 Exit Poll :  राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडली. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे.

MVA Wins In Maharashtra Election 2024

MVA Wins In Maharashtra Election 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात येणार महाविकास आघाडीचं सरकार! किती जागा जिंकणार?

point

विधानसभा निवडणुकीत महायुतीला बसणार धक्का!

point

कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? वाचा सविस्तर माहिती

Maharashtra Election 2024 Exit Poll :  राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडली. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार की महायुतीचं? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. अशातच दैनिक भास्करच्या एक्झिट पोलने खळबळ उडवली आहे. या एक्झिट पोलनुसार, भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाला किती जागा मिळतील, याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

हे वाचलं का?

दैनिका भास्करच्या एक्झिट पोलनुसार महायुतीत भाजपला 80-90, शिवसेना शिंदे गटाला 30-35, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला 15-20, तर महाविकास आघाडीत काँग्रेसला 58-60, शिवसेना ठाकरे गटाला 30-35, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा 50-55 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि वंचित बहुजन आघाडीचा 2-3 जागांवर विजय होईल, तर इतर पक्ष 0-25 जागा जिंकलीत, असं सांगण्यात आलंय. या आकडेवारीनुसार महायुतीला 288 जागांपैकी एकूण 125-140, तर महाविकास आघाडी 135-150 जागांवर बाजी मारून सत्तेत येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 Exit Poll Live : अपक्ष आणि लहान पक्ष किंगमेकर ठरणार? एक्झिट पोल काय?

इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोलनुसार, राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाला 44, काँग्रेसला 60, एनसीपी (शरद पवार) गटाला 46 जागांवर विजय मिळणार आहे. म्हणजेच मविआला 288 जागांपैकी 150 जागांवर बाजी मारता येणार आहे. तर महायुतीत भाजपला 78, शिवसेना शिंदे गटाला 26, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 14 जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात महायुती सरकारला धक्का मिळणार असून महाविकास आघाडी बाजी मारणार असल्याचं या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे. 

    follow whatsapp