Eknath Shinde: राज्यात राजकीय घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे अचानक गेले गावाला...दिल्लीत घडलंय तरी काय?

मुंबई तक

• 03:33 PM • 29 Nov 2024

Eknath Shinde Latest News: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

Eknath Shinde Latest News Update

Eknath Shinde Latest News Update

follow google news

बातम्या हायलाइट

point

महायुतीची मुंबई होणारी बैठक रद्द!

point

एकनाथ शिंदे अचानक का गेले गावाला?

point

दिल्लीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Eknath Shinde Latest News: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. अशातच मुंबईत महायुतीची आज होणारी बैठक रद्द झालीय. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यात त्यांच्या गावी गेले आहेत. ते उद्या शनिवारी परत येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी महायुतीचे तीन बडे नेते म्हणजेच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची दिल्लीत अमित शाहांसोबत काल बैठक झाली. तीन तास या बैठकीत खलबतं झाल्यानंतर तिन्ही नेते मुंबईत परतले. त्यामुळे आज महायुतीची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार होती.

हे वाचलं का?

एकनाथ शिंदे अचानक सातारा जिल्ह्यातील त्यांच्या गावी गेल्याचं समजते. त्यामुळे मुंबईत आज होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. साताऱ्याहून शिंदे शनिवारी परतल्यानंतर मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होईल आणि महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली जाईल, असं बोललं जात आहे.
दरम्यान, गृहमंत्री अमित शाहा यांनी काल गुरुवारी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, एनसीपीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरेही शाहा यांच्या निवासस्थानी उपस्थित होते.

हे ही वाचा >> 29th November Gold Rate : अहो राव! काय 'ते' सोन्याचे भाव; आजच्या 1 तोळा दराने सर्वांनाच फोडलाय घाम

ही बैठक तीन तास चालली पण या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करण्यात आलं नाही. बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उशिरा रात्री मुंबईत पोहोचले. या बैठकीनंतर शिंदे म्हणाले, ही बैठक सकारात्मक झाली. ही पहिली बैठक होती. अमित शाहा आणि जे पी नड्डा यांच्यासोबत आम्ही चर्चा केली. मुंबईत महायुतीची दुसरी बैठक घेतली जाईल, त्यावेळी मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित केलं जाईल. 

हे ही वाचा >> Mumbai Bhandup School Case : मुंबईतील भांडुपमध्ये नामांकित शाळेत 3 विद्यार्थीनींसोबत गैरवर्तन, बदलापूरची पुनरावृत्ती?

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला घोषित करण्यात आला. या निवडणुकीत महायुतीने 233 जागा जिंकून बहुमत मिळवलं. परंतु, महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्यापही जाहीर करण्यात आला नाहीय. एकट्या भाजपने 132 जागा जिंकून राज्यात भाजपच नंबर वन पक्ष असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत 41 जागा जिंकल्या. 

    follow whatsapp