Mahim Vidhan Sabha Results: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीत ज्या मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे मुंबईतील माहीम मतदारसंघ. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाल्यापासूनच माहीम मतदारसंघ चर्चेत आला होता. आता याच मतदारसंघाचा नेमका निकाल समोर आला आहे.
ADVERTISEMENT
माहीम मतदारसंघातून शिवसेना UBT पक्षाच्या महेश सावंत यांचा विजय
हाती आलेल्या निकालानुसार, माहीम मतदारसंघातून शिवसेना UBT पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांनी अतिशय रोमांचक असा विजय मिळवला आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. या लढतीत ते चक्क तिसऱ्या स्थानी फेकल्या गेले. तर शिवसेनेचे सदा सरवणकर हे दुसऱ्या स्थानी होती. दरम्यान या निकालाने माहीम विधानसभा मतदारसंघातील अनेक गणित बदलली आहेत.
हे ही वाचा>> Maharashtra CM: मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!
माहीम या मतदारसंघातून मनसेने अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केल्यापासून हा मतदारसंघ हाय-व्होल्टेज ठरला होता. कारण इथून महायुतीने उमेदवार देऊ नये अशी मागणी काही भाजप नेत्यांकडूनच करण्यात येत होतं. असं असताना देखील शिवसेना (शिंदे गट) यांनी माहीममधून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकीट दिलेलं.
त्यावरून अनेक मनसे नेते आणि पदाधिकारी यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर बरीच टीकाही केली होती. कारण लोकसभेला मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. एवढंच नव्हे तर श्रीकांत शिंदेंसाठी जाहीर सभाही घेतली होती. असं असताना देखील शिंदेंनी सरवणकरांना तिकीट दिल्याने त्यांच्यावर मनसैनिकांकडून टीका केली जात होती.
हे ही वाचा>> Balasaheb Thorat Lost Elections : काँग्रेस हादरली, बाळासाहेब थोरात यांचा पराभव, तो जायंट किलर कोण?
तर दुसरीकडे शिवसेना (UBT) ने देखील या मतदारसंघातून महेश सावंत यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होती. ज्यामध्ये शिवसेना UBT पक्षाच्या महेश यांनी विजय मिळवत मोठा इतिहास रचला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा 288 मतदारसंघांचा निकाल पाहण्यासाठी https://www.mumbaitak.in/ या लिंकवर क्लिक करा
ADVERTISEMENT