Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Updates: मुंबई निवडणूक 2024 चा निकाल LIVE: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल आज (23 नोव्हेंबर) जाहीर होणार आहेत. ज्यामध्ये मुंबईतील 36 मतदारसंघात नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. ज्याचे लाइव्ह अपडेट आम्ही आपल्याला इथे देणार आहोत.
मुंबईत यंदा अत्यंत चुरशीच्या अशा लढाई पाहायला मिळणार आहेत. कारण अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना आहे. अशावेळी मुंबईकर ठाकरे की शिंदे यापैकी कोणाला पसंती देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचा>> Mumbai Assembly Election 2024 Result: Exit Poll: 'या' मतदारसंघात 'हे' उमेदवार होणार विजयी, यादीच आली समोर: सर्व्हे
दुसरीकडे भाजप आणि काँग्रेस देखील मुंबईत आपलं अस्तित्व टिकावं यासाठी प्रयत्नशील असणार आहे. अशावेळी या सगळ्या मतदारसंघांमध्ये नेमके काय निकाल लागणार याबाबत मुंबईकरांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.
हे ही वाचा>> Mumbai Assembly Election 2024 Result: Maharashtra Election Exit Poll Results 2024: कोणाचा विजय, कोण पराभूत? एक्झिट पोलमधून सगळंच क्लिअर!
मुंबईतील विधानसभा निवडणूक निकालाचे क्षणाक्षणाचे संपूर्ण अपडेट आपल्याला या लाइव्ह ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील.
याशिवाय प्रत्येक मतदारसंघातील निकाल आणि इतर सगळ्या घडामोडी Mumbaitak.in या आमच्या वेबसाइटवर तुम्हाला मिळतील.
ADVERTISEMENT
- 07:16 PM • 23 Nov 2024Mumbai Assembly Election Results Live: 'महाराष्ट्राने मतदान केलंय की EVM?', आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
"सर्वच वरळीकरांचं मी मनापासून आभार मानतो. आम्ही जी सेवा गेली पाच वर्ष त्यांच्या चरणी केली, त्याचं मतांमध्ये रुपांतर झालेलं आहे. आमचे शिवसेनेचे जे वरिष्ठ नेते, कार्यकर्ते, सहकारी आणि मित्र पक्षांचेही आभार मानतो. आज वरळीत विजय झाला आहे. जिथे आम्ही निष्ठावंत म्हणून काम केलं, तिथे सर्व ठिकाणी विजय झाला आहे. महाराष्ट्रात जिथे जिथे आम्ही जिंकलोय, त्या सर्वांचे मी आभार मानतो. जसा निकाल अपेक्षित होता तसा आला नाहीय. महाराष्ट्राने मतदान केलंय की ईव्हीएमने, हा एक प्रश्न आहेच. त्या सर्वावर नंतर आम्ही चर्चा करू. आता निकालाचा आढावा घेत आहे. त्यानंतर आम्ही बोलू. हाच महाराष्ट्र ज्याने आम्हाला लोकसभेत आशीर्वाद दिले. पण आता जे निकाल आम्हाला अपेक्षीत होते, मला वाटत नाही तशाप्रकारे निकाल आले आहेत. हे मान्य करून पुढं जावं लागेल. पण यात ईव्हीएमने किती प्रचार केला? हे पण बघावं लागेल, अशी मोठी प्रतिक्रिया आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली.
- 06:53 PM • 23 Nov 2024Mumbai Assembly Election Results Live: "महायुती महाराष्ट्रात तुष्टीकरण नाही तर...", आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?
भाजप नेते आशिष शेलारांचं ट्वीट जसंच्या तसं...
महायुती महाराष्ट्रात तुष्टीकरण नाही तर विकास घडवते हे जनतेला आता कळलंय. म्हणून आमच्या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आणि महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीवर विश्वास दाखवत आपल्या सर्वसामान्यांच सरकार पुन्हा निवडून आणलंय. यासाठी महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनतेचे मनःपूर्वक आभार !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, मा. गृहमंत्री अमितभाई शाह, मा.भाजपाचे राष्ट्रीय नेते जे. पी. नड्डा जी, मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! - 06:51 PM • 23 Nov 2024Mumbai Assembly Election Results Live: "जे आमदार होतात, ते पुन्हा रिपीट...", आमदार विश्वनाथ भोईर काय म्हणाले?
"महाराष्ट्रात महायुतीची जी घौडदौड चालू आहे. त्याप्रमाणेच कल्याण पश्चिममध्येही महायुतीचा प्रचंड विजय झाला आहे. महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि मतदारराजा यांनी पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. जे आमदार होतात ते पुन्हा रिपीट होत नाहीत, असं बोलत होते. परंतु, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ते दाखवून दिलं. महायुतीने महाराष्ट्रात ज्या ज्या योजन राबवल्या आहेत, त्याचा हा परिणाम आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून मला पुन्हा एकदा निवडून दिलं आहे. महायुतीची मतं विभागली असती, तर त्याचा दुष्परिणाम झाला असता", अशी मोठी प्रतिक्रिया कल्याण पश्चिमचे विजयी उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी दिली.
- 06:11 PM • 23 Nov 2024Mumbai Assembly Election Results Live: "विरोधी पक्षाची जागाही...", अजित पवार नेमकं काय म्हणाले?
"18 तारखेच्या शेवटच्या सभेपर्यंत मी ठरवलं होतं की, कुणावर टीका टीपण्णी करायची नाही. आपण आपला कार्यक्रम सांगायचा. वाचाळविरांनी काही विधान केलं असेल, तर तेव्हढ्यापुरतं आपलं मत सांगायचं. उद्याच्या काळात आमचं सरकार आल्यावर आमचं व्हिजन काय आहे, ते सांगायचं आणि याच पद्धतीनं मी शेवटपर्यंत प्रचाराची यंत्रणा राबवली. मी अनेक मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न केला. दुर्देवाने काही ठिकाणी मला जाता आलं नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी जास्तीत जास्त मतदारसंघापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या पद्धतीनं आम्ही प्रचाराची यंत्रणा राबवली. त्याला चांगल्या प्रकारचं यश आलं. 29 पर्यंत आकडा न गेल्यानं विरोधी पक्षाची जागाही भरली जाणार नाही. कमीत कमी 29 जागा त्या पक्षाच्या लागतात. मतदारांनी खूप मोठी जबाबदारी आमच्यावर टाकली आहे. आम्ही 55 जागा लढवल्या, त्यामुळे आमचा स्ट्राईक रेटही चांगला आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना दिली.
- 05:49 PM • 23 Nov 2024Mumbai Assembly Election Results Live: वर्षा बंगल्यावर खलबतं! शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत काय घडलं?
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव कार्यकारिणीने मंजूर केला. कार्यकारीणीने एकनाथजी शिंदे यांना महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्याकरिता व मित्र पक्षांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेण्यासाठी सर्वाधिकार दिले. विधीमंडळातील शिवसेना गटनेते, प्रतोद आणि इतर महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे सर्व अधिकार कार्यकारिणीने एकनाथजी शिंदे यांना दिलेले आहेत.
- 05:32 PM • 23 Nov 2024Mumbai Assembly Election Results Live: CM शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली सडकून टीका, म्हणाले...
"लाडकी बहीण योजनेसह शासन आपल्या दारी सुरु केलं. लोकांनी विश्वास ठेवला. हे देणारं सरकार आहे. हे बोलणारं सरकार नाही. आचारसंहिता लागण्याआधी आम्ही नोव्हेंबरचे पण पैसे दिले. एकंदरीत या राज्यात सर्वसामान्यांचं सरकार कायतरी करतंय, ही भावना लोकांच्या मनात निर्माण झाली. सामान्य लोकांच्या जीवनात बदल घडवून त्यांना सुपरमॅन करायचं, असं आम्ही ठरवलंय. लोकांनी कल्याणाचं आणि विकासाचं राजकारण स्वीकारलं. लोकसभेत फेक नरेटिव्ह केलं. तरीही प्रधानमंत्री मोदीच झाले. सरकार पडणार असं रोज बोलायचे. आम्ही आरोपाला कामातून उत्तर दिलं. ते काम लोकांना भावलं. घरी बसून फेसबुकवरून सरकार चालवता येत नाही. म्हणून शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. 2014 ला जे सरकार स्थापन व्हायलं पाहिजे होतं. ते झालं नाही. लोकांनी विकासाला महत्त्व दिलं", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
- 03:49 PM • 23 Nov 2024Mumbai Assembly Election Results Live: "कार्यकर्ता घासून पुसून नाय तर ठासून विजयी झाला", श्रीकांत शिंदेंचं मोठं विधान
"हा मोठा विजय आहे. कल्याण ग्रामीणच्या जनतेचा हा विजय आहे. आम्ही दहा वर्ष जे काम केलं, हा त्याचा विजय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली या सरकारे अडीच वर्ष जे काम केलं, त्याचा हा विजय आहे. एक कार्यकर्ता घासून पुसून नाय तर ठासून विजयी झाला आहे. महायुतीने अडीच वर्षात चांगलं काम केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोठं यश मिळालं आहे. महायुतीला एकतर्फी विजय मिळाला आहे", अशी मोठी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलीय.
- 03:36 PM • 23 Nov 2024Mumbai Assembly Election Results Live: ठाणे जिल्ह्यात कोणते उमेदवार झाले विजयी?
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज 23 नोव्हेंबरला जाहीर झाला. या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून कोणते उमेदवार विजयी झाले, याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
- एकनाथ शिंदे - शिवसेना, कोपरी पाचपाखाडी
- प्रताप सरनाईक - शिवसेना, ओवळा माजीवाडा
- संजय केळकर - ठाणे शहर, भाजप
- जितेंद्र आव्हाड - कळवा, मुंब्रा
- गणेश नाईक - ऐरोली, भाजप
- मंदा म्हात्रे - बेलापूर, भाजप
- किसन कथोरे - मुरबाड, भाजप
- कुमार आयलानी - उल्हासनगर, भाजप
- बालाजी किणीकर- अंबरनाथ, शिवसेना
- सुलभा गायकवाड- कल्याण पूर्व, भाजप
- रवींद्र चव्हाण- डोंबिवली, भाजप
- राजेश मोरे - कल्याण ग्रामीण, शिवसेना
- शांताराम मोरे - भिवंडी ग्रामीण, शिवसेना
- महेश चौघुले- भिवंडी पश्चिम, भाजप
- रईस शेख- भिवंडी पूर्व, समाजवादी पार्टी
- दौलत दरोडा-शहापूर, अजित पवार गट
- विश्वनाथ भोईर- कल्याण पश्चिम, शिवसेना
- नरेंद्र महेता- मीरा भाईंदर, भाजप
- 02:59 PM • 23 Nov 2024Mumbai Assembly Election Results Live: 'या' उमेदवारांनी मारली बाजी, मतदारसंघात उधळला विजयाचा गुलाल
बेलापूर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे विजयी झाल्या आहेत. डोंबिवली मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रविंद्र चव्हाण विजयी झाले आहेत. तर कल्याण पूर्वमधून भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी बाजी मारलीय. कल्याण ग्रामीणमधून महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी विजयाच गुलाल उधळला आहे.
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महायुतीचे विजयी उमेदवार राजेश मोरे यांच्यासोबत विजयी मिरवणूक काढली.
- 02:39 PM • 23 Nov 2024Mumbai Assembly Election Results Live: "संजय राऊत 9 वाजेचा भोंगा आता...", भाजप नेत्या चित्रा वाघ कडाडल्या
"आमचे नेते प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करतील आणि निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या इच्छेचा आदर होईल. आमच्या सर्वांच्या मनातला देवा भाऊ खुर्चीवर येतील, असं माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांना वाटतंय. संजय राऊत बोलतात हा निकाल महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य नाही, यावर बोलताना वाघ म्हणाल्या, तुम्हाला (संजय राऊत) कोण विचारतंय, तुम्ही कायम कारस्थानं केली. आम्ही विकासाचं काम केलं. विकासाच्या गप्पा केल्या. महायुती सरकारने अडीच वर्षात जो विकास केला, तो विकास सर्व राज्यातील प्रत्येक घटकासाठी केला. गोर गरिबापर्यंत आमच्या सर्व योजना पोहोचल्या. संजय राऊत 9 वाजेचा भोंगा आता भंगारात गेलाय. त्याला तिथेही कुणी विकत घेणार नाही, ही परिस्थिती आहे. प्रत्येक वेळी कट कारस्थान करणाऱ्या लोकांना महाराष्ट्राच्या जनतेनं करारा थप्पड दिला आहे", अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
- 02:24 PM • 23 Nov 2024Mumbai Assembly Election Results Live: माहिम मतदारसंघात कोण मारणार बाजी? 18 व्या फेरीत कोण आघाडीवर?
माहिम विधानसभा मतदारसंघात 18 व्या फेरीत मनसेचे उमेदवार अमित ठाकरेंना 30703, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेश सावंत यांना 46579, तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना 45239 मतं मिळाली आहेत. सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. तर अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं समोर आलंय.
- 02:12 PM • 23 Nov 2024Mumbai Assembly Election Results Live: वरळी विधानसभेत मतदारांचा कौल कुणाला? वाचा मतदानाची आकडेवारी
वरळी विधानसभा मतदारसंघात 13 व्या फेरीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आदित्य ठाकरे आघाडीवर असून त्यांना 50352 मतं मिळाली आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरांना 42912 इतकं मताधिक्य मिळालं आहे. तर मनसेच्या संदीप देशपांडेंना 16898 मतं मिळाली आहेत. अखेरच्या फेरीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा आदित्य ठाकरेंना पिछाडीवर टाकतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
- 01:48 PM • 23 Nov 2024Mumbai Assembly Election Results Live: "राज ठाकरे साहेब महाराष्ट्राचे...", प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले?
"राज ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मोठे नेते आणि राहतील. परंतु, निवडणुका ज्या गांभीर्याने लढवाव्या लागतात. तिथे कुठेतरी ते कमी पडले. जेव्हा महायुतीचा प्रश्न आला, तिथे आम्ही कोणत्याही गोष्टीवर तडजोड केली नाही. पहिलं आम्ही अमित ठाकरेंच्या इथे समर्थन दिलं होतं. परंतु, नंतर एकनाथ शिंदेंचे उमेदवार सदा सरवणकर असतील, अशी भूमिका आली. त्यावेळी आम्ही भूमिका घेतली की, महायुतीत वितुष्ट नको. मनसेनं उमेदवार उभे केले आहेत. मनसेची जमेची बाजू फक्त राज ठाकरे साहेब आहेत आणि त्यांच वकृत्व. निवडणुका आता एव्हढ्या कठीण झाल्या आहेत की, त्याला एक मॅनेजमेंट लागतं", अशी मोठी प्रतिक्रिया भाजप नेते प्रविण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
- 01:23 PM • 23 Nov 2024Mumbai Assembly Election Results Live: 'त्या' कामाची पोचपावती या निवडणुकीत आम्हाला मिळाली, CM शिंदे नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले, "मी महाराष्ट्रातल्या मतदारांचे आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो. त्यांचं अभिनंदन करतो. महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळतंय. लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, लाडके भाऊ, या समाजातील प्रत्येक घटकाने महायुतीला भरभरून मतदान केलं. गेले अडीच वर्ष या काळात महायुतीने जे काम केलं, त्या कामाची पोचपावती या निवडणुकीत आम्हाला मिळाली. आम्ही सर्वसामान्यांचा सरकार म्हणतो. सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काय करू शकतं, हे आम्ही अनेक योजनांच्या आणि विकासाच्या माध्यमातून दाखवून दिलं. सरकारची प्रामाणिक इच्छा असेल, तर अशाप्रकारच्या योजना सुरु करु शकते. म्हणूनच सर्वसामान्यांच्या भल्यासाठी हे सरकार आलं आहे.
एकीकडे विकास केला, दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या. त्याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. मला आनंद आहे, महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांनी महायुतीवर विश्वास ठेवला. न भुतो न भविष्यतो, अशाप्रकारचा विजय मिळवून दिला. विधानसभेच्या पहिल्या भाषणात मी म्हणालो होतो. आमचे महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील. महायुती 200 पार होईल. पण त्यापेक्षाही पुढे आम्ही गेलो. हा विजय ऐतिहासिक आहे. आता आमची जबाबदारी वाढलेली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आम्ही काम केलं. मोदीजींनी देखील या सरकारला पाठिंबा दिला. अमितभाईंनी पाठिंबा दिला. त्याचबरोबर अनेक नेते महाराष्ट्रात आले. सर्वांनी या निवडणुकीत मार्गदर्शन केलं आणि कामही केलं. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे या सर्व गोष्टी घडल्या".
- 11:41 AM • 23 Nov 2024Mumbai Assembly Election Results Live: वसई, ऐरोली, बेलापूर, कल्याण विधानसभा मतदारसंघात कोणते उमेदवार आघाडीवर?
वसई विधानसभा दहाव्या फेरीनंतर एकूण मतदान
विजय पाटील (काँग्रेस) - ३०२९४
हितेंद्र ठाकूर (बविआ) २७१८९
स्नेहा दुबे (भाजप) २५३७७
नोटा ९११विजय पाटील ३ हजार १०५ मतांनी आघाडीवर
ऐरोली विधानसभा 8 वी फेरी
गणेश नाईक -भाजप 3768
निलेश बाणखेले मनसे 600
एम के मढवी उबाठा 1096
अंकुश कदम स्वराज्य 98
विजय चौगुले अपक्ष 1723गणेश नाईक 11202 एवढ्या मतांनी आघाडीवर
गणेश नाईक यांना 31 हजार 949 मतदान तर विजय चौगुले यांना 20 हजार 747 मतदान
बेलापूर विधानसभा १५१आठवी फेरी
उमेदवार. पक्ष. मिळालेली मते
१) मंदा म्हात्रे (भाजप) : २५५४१
२) संदिप नाईक (मा.वि.आ) : २४७२६
३) गजानन काळे (मनसे) ३१५४
४)विजय नाहटा (अपक्ष)७५६
५) मंगेश आमलें (अपक्ष)१५८नोटा १०१
२५०० मंदा म्हात्रे आघाडीवर
एकूण मते ६३१८०
कल्याण ग्रामीण विधानसभा उमेदवार ( आठवी फेरी)
महायुतीचे उमेदवार राजेश मोरे - 39005
राजेश मोरे 20791 मतांनी आघाडीवर
मनसे उमेदवार राजू पाटील - 18214
ठाकरे गट सुभाष भोईर - 16036 - 11:35 AM • 23 Nov 2024Mumbai Assembly Election Results Live: डोंबिवली-ठाण्यात मतदानाची आकडेवारी काय?
डोंबिवली विधानसभा चौथी फेरी
महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण - 23387
रविंद्र चव्हाण 9383 मतांनी आघाडीवर
ठाकरे गट दिपेश म्हात्रे - 14004ठाणे विधानसभा (6 फेरी फेरी )
संजय केळकर - भाजप - 4161
राजन विचारे - उद्धव सेना - 2174
अविनाश जाधव - मनसे - 1063
नोटा -
आघाडी - केळकर - 1987
एकूण आघाडी - 15331 - 11:33 AM • 23 Nov 2024Mumbai Assembly Election Results Live: बेलापूर मतदारसंघात कोण मारणार बाजी?
बेलापूर - भाजप मंदा म्हात्रे : ३२८०
एनसीपी संदीप नाईक: ३०६९
मनसे गजानन काळे ४२२
अपक्ष विजय नाहटा ७५८ - 11:32 AM • 23 Nov 2024Mumbai Assembly Election Results Live: मिरा भाईंदर 145 विधानसभा मतदार संघ, वाचा मतदानाची आकडेवारी
मिरा भाईंदर 145 विधानसभा मतदार संघ
पोस्टल बॅलेट मतदान - पहिली फेरी
1) महाविकास आघाडी काँग्रेस उमेदवार मुजफ्फर हुसेन - 6070
2 ) महायुती भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता - 3597
3) अपक्ष उमेदवार गीता जैन - 791
4) मनसे संदीप राणे - 192
5 ) अपक्ष उमेदवार अरुण कदम - 15
6) अपक्ष उमेदवार हंसूकुमार पांडे - 11
11615 मतांची मोजणी
- 11:30 AM • 23 Nov 2024Mumbai Assembly Election Results Live: कोणत्या मतदारसंघात कोणते उमेदवार आघाडीवर?
कल्याणमध्ये पूर्वमध्ये भाजपच्या उमेदवार सुलभा गायकवाड 6581 मतांनी आघाडीवर आहेत. मिरा भाईंदर 145 विधानसभा मतदार संघ पोस्टल बॅलेट मतदान - पहिली फेरी 1) महाविकास आघाडी काँग्रेस उमेदवार मुजफ्फर हुसेन - 6070 2 ) महायुती भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता - 3597 3) अपक्ष उमेदवार गीता जैन - 791 4) मनसे संदीप राणे - 192 5 ) अपक्ष उमेदवार अरुण कदम - 15 6) अपक्ष उमेदवार हंसूकुमार पांडे - 11 11615 मतांची मोजणी बेलापूर - भाजप मंदा म्हात्रे : ३२८० एनसीपी संदीप नाईक: ३०६९ मनसे गजानन काळे ४२२ अपक्ष विजय नाहटा ७५८ कोपरी-पाचपाखाडी पहिली फेरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - 5477 केदार दिघे ( ठाकरेंची शिवसेना ) - 1424 4 हजार 53 मतांनी एकनाथ शिंदे आघाडीवर ओवळा-माजीवडा ( दुसरी फेरी ) प्रताप सरनाईक - ( शिंदेंची शिवसेना ) 8091 नरेश मणेरा - ( ठाकरेंची शिवसेना ) 2417 संदीप पाचंगे ( मनसे ) - 375 11542 मतांनी प्रताप सरनाईक आघाडीवर 149 कळवा मुंब्रा मतदार संघ पहिल्या फेरीत जितेंद्र आवड आघाडीवर जितेंद्र आव्हाड 8262 नजीब मुल्ला 4726 सुशांत सूर्यराव1696 नोटा 266 150
- 08:30 AM • 23 Nov 2024Mumbai Assembly Election Results Live: मुंबईत कोणते उमेदवार आघाडीवर अन् कोण पिछाडीवर?
मुंबईच्या वरळी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत.
वांद्रे पूर्व मतदारसंघात झिशान सिद्दीकी आघाडीवर आहेत.
कुलाबा मतदारसंघातून भाजपचे राहुल नार्वेकर आघाडीवर आहेत.
अमित ठाकरे माहीममधून आघाडीवर आहेत.
नालासोपारा इथे क्षितिज ठाकूर आघाडीवर आहेत.
बोरीवली पश्चिममधून भाजपचे संजय उपाध्यय यांनी निकालपूर्वीच विजयाचा झेंडा फडकवाल आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजता महाजल्लोष विजय यात्रा सुर करणार असल्याचं उपाध्यय यांच्या बॅनरमध्ये नमूद करण्यात आलंय.
मुंब्रा कळवा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड आघाडीवर आहेत.
वडाळ्यातून भाजपचे काळीदास कोळमकर आघाडीवर आहेत.
ठाणे पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत.ठाणे शहरमधून संजय केळकर आघाडीवर आहेत.
माजीवाडा मतदारसंघातून प्रताप सरनाईक आघाडीवर आहेत.
माहिममध्ये शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवर आहेत.
वांद्रे पूर्वमधून शिवसेना ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई आघाडीवर आहेत.
कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे अतुल भातखळकर 4462 मतांनी आघाडीवर
मालाडमध्ये विनोद शेलार 5499 मतांनी आघाडीवर आहे.
कुर्ला विधानसभेत शिवसेनेचे मंगेश कुडालकर 2360 मतांनी आघाडीवर आहेत.
कल्याणमध्ये पूर्वमध्ये भाजपच्या उमेदवार सुलभा गायकवाड 6581 मतांनी आघाडीवर आहेत.
पोस्टल बॅलेट मतदान - पहिली फेरी
1) महाविकास आघाडी काँग्रेस उमेदवार मुजफ्फर हुसेन - 6070
2 ) महायुती भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता - 3597
3) अपक्ष उमेदवार गीता जैन - 791
4) मनसे संदीप राणे - 192
5 ) अपक्ष उमेदवार अरुण कदम - 15
6) अपक्ष उमेदवार हंसूकुमार पांडे - 11
11615 मतांची मोजणी
बेलापूर - भाजप मंदा म्हात्रे : ३२८०
एनसीपी संदीप नाईक: ३०६९
मनसे गजानन काळे ४२२
अपक्ष विजय नाहटा ७५८कोपरी-पाचपाखाडी पहिली फेरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - 5477
केदार दिघे ( ठाकरेंची शिवसेना ) - 1424
4 हजार 53 मतांनी एकनाथ शिंदे आघाडीवर
ओवळा-माजीवडा ( दुसरी फेरी )
प्रताप सरनाईक - ( शिंदेंची शिवसेना ) 8091
नरेश मणेरा - ( ठाकरेंची शिवसेना )
2417संदीप पाचंगे ( मनसे ) - 375
11542 मतांनी प्रताप सरनाईक आघाडीवर
149 कळवा मुंब्रा मतदार संघ
पहिल्या फेरीत जितेंद्र आव्हाड आघाडीवर
जितेंद्र आव्हाड 8262
नजीब मुल्ला 4726
सुशांत सूर्यराव1696
नोटा 266150 - ऐरोली मतदार संघ : पहिली फेरी
गणेश नाईक - भाजपा : 4581
एम. के. मढवी - शिवसेना (UBT) : 763
विजय चौगुले - अपक्ष : ( शिवसेना शिंदे बांदखोर 2137कल्याण पूर्व विधानसभा उमेदवार ( तिसरी फेरी )
भाजप उमेदवार सुलभा गणपत गायकवाड- 9724
महेश गायकवाड - 6957
ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोराडे - 4940पहिल्या फेरीत दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय निरुपम 621 मतांनी आघाडीवर
संजय निरुपम शिवसेना एकनाथ शिंदे 4126
सुनील प्रभू शिवसेना उद्धव ठाकरे 3505
मिरा भाईंदर दुसरी फेरी
मिरा भाईंदर मधून नरेंद्र मेहता आघाडीवर
काँग्रेचे मुझफ्फर हुसेन पिछाडीवर
तिसरी फेरी
मुंब्रा-कळवा विधानसभा निवडणूक
जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी शरद पवार) - 21658
नजिब मुल्ला - (अजित पवार गट) - 12,977
सुशांत विलास सूर्यराव (मनसे) - 4346
मिरा भाईंदर 145 विधानसभा मतदार संघ - मतदान निकाल दुसरी फेरी एकूण 24 फेऱ्या -
1) महाविकास आघाडी काँग्रेस उमेदवार मुजफ्फर हुसेन - 1950 मते
2 ) महायुती भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता - 8302 मते
3) अपक्ष उमेदवार गीता जैन - 1066 मते
4) मनसे संदीप राणे - 129 मते
5 ) अपक्ष उमेदवार अरुण कदम - 97 मते
6) अपक्ष उमेदवार हंसूकुमार पांडे - 29 मते
7 ) NOTA - 118 मते
एकूण 11835 मतांची मोजणी झाली आहे.
◆डोंबिवली विधानसभा चौथी फेरी
महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण - 23387
रविंद्र चव्हाण 9383 मतांनी आघाडीवर
ठाकरे गट दिपेश म्हात्रे - 14004ठाणे विधानसभा (6 फेरी फेरी )
संजय केळकर - भाजप - 4161
राजन विचारे - उद्धव सेना - 2174
अविनाश जाधव - मनसे - 1063
नोटा -
आघाडी - केळकर - 1987
एकूण आघाडी - 15331वसई विधानसभा दहाव्या फेरीनंतर एकूण मतदान
विजय पाटील (काँग्रेस) - ३०२९४
हितेंद्र ठाकूर (बविआ) २७१८९
स्नेहा दुबे (भाजप) २५३७७
नोटा ९११विजय पाटील ३ हजार १०५ मतांनी आघाडीवर
ऐरोली विधान सभा 8 वी फेरी
गणेश नाईक -भाजप 3768
निलेश बाणखेले मनसे 600
एम के मढवी उबाठा 1096
अंकुश कदम स्वराज्य 98
विजय चौगुले अपक्ष 1723गणेश नाईक 11202 एवढ्या मतांनी आघाडीवर
गणेश नाईक यांना 31 हजार 949 मतदान तर विजय चौगुले यांना 20 हजार 747 मतदान
नवी मुंबई
बेलापूर विधानसभा १५१
आठवी फेरी
उमेदवार. पक्ष. मिळालेली मते
१) मंदा म्हात्रे (भाजप) : २५५४१
२) संदिप नाईक (मा.वि.आ) : २४७२६
३) गजानन काळे (मनसे) ३१५४
४)विजय नाहटा (अपक्ष)७५६
५) मंगेश आमलें (अपक्ष)१५८नोटा १०१
२५०० मंदा म्हात्रे आघाडीवर
एकूण मते.६३१८०
कल्याण ग्रामीण विधानसभा उमेदवार ( आठवी फेरी)
महायुतीचे उमेदवार राजेश मोरे - 39005
राजेश मोरे 20791 मतांनी आघाडीवर
मनसे उमेदवार राजू पाटील - 18214
ठाकरे गट सुभाष भोईर - 16036
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT