Mumbai Tak Chavadi: 'उद्धव ठाकरे दिलेला शब्द पाळतात का?', पाहा पूनम महाजन काय म्हणाल्या

मुंबई तक

• 10:14 PM • 07 Nov 2024

Poonam Mahajan on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे दिलेला शब्द पूर्ण करतात का? या प्रश्नावर पूनम महाजन यांनी नेमकं काय उत्तर दिलं ते जाणून घ्या

'उद्धव ठाकरे दिलेला शब्द पाळतात का?'

'उद्धव ठाकरे दिलेला शब्द पाळतात का?'

follow google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरे दिलेला शब्द पाळतात का?

point

पाहा पूनम महाजन नेमकं काय म्हणाल्या

point

मुंबई Tak चावडीवर पूनम महाजनांची रोखठोक उत्तरं

Poonam Mahajan Mumbai Tak Chavadi: मुंबई: भाजप नेत्या पूनम महाजन या मागील काही दिवसांपासून बऱ्याच चर्चेत आहेत. लोकसभा निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर त्यांना विधानसभेसाठी संधी दिली जाईल अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, तिथेही त्यांना डावलण्यात आलं. या सगळ्या प्रश्नावर पूनम महाजन यांनी मुंबई Tak चावडीवर खुलेपणाने उत्तरं दिलं. पण याचवेळी त्यांना उद्धव ठाकरेंबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर बोलताना त्या नेमकं काय म्हणाल्या ते आपण सविस्तर पाहूया... (mumbai tak chavadi exclusive does uddhav thackeray keep his word see bjp leader poonam mahajan exact answer)

हे वाचलं का?

प्रश्न: उद्धव ठाकरे दिलेला शब्द पाळतात का? 

पूनम महाजन: मी राजकारणात आहे त्यामुळे हो किंवा नाहीमध्ये या प्रश्नाचं उत्तरच देऊ शकत नाही. असं कसं असेल.. कारण माझ्या हो किंवा नाही मध्ये तुम्ही केवढी ब्रेकिंग न्यूज लावाल.. 

त्यांनी (उद्धव ठाकरे) माझ्यासोबत कॉफी प्यायचा शब्द खूप वेळापासून पाळला नाहीए. ही गोष्ट खरी आहे.. कारण वाइल्ड लाइफ, आयुष्य.. आता त्यांना सांगावा लागेल की, तुम्ही दिलेला शब्द पाळलेला नाही. पण तुम्ही कोणत्या कॉन्टॅक्समध्ये बोलतात मला ते समजलं नाही.

हे ही वाचा>> Amit Thackeray : पुतण्या अमित ठाकरेला उद्धव ठाकरे छुपी मदत करणार? 'या' कारणामुळे होतेय चर्चा

कारण मी काही त्यांच्यासोबत काम करत नाही किंवा मी शिवसेनेत काम करते. असा काहीच माझा संबंध नाही. 

मला वाटतं तुम्ही 2019 च्या निवडणुकीविषयी बोलत आहात. उद्धवजी शब्द पाळतात की नाही पाळत... 

बघा.. मी त्या बैठकीत नव्हते किंवा मी मातोश्रीवर होते. मी उगीच स्वत:ला एवढं महान समजू शकत नाही. मी फक्त एकच लॉजिकल प्रश्न एका भाषणात विचारला होता जर 50-50 टक्के तुम्हाला अमितभाईंनी शब्द दिला होता. समजा... त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीआधीच महापौर बदलत होते अडीच वर्षानंतर मग ते 50 टक्क्यांचे महापौर भाजपला का नाही मिळाले? लॉजिकल प्रश्न आहे. 

आता कोणाचा शब्द होता.. काय होता मला माहीत नाही. मला वाटतं  याच संबंधी तुम्ही प्रश्न विचारला होतात. असं पूनम महाजन म्हणाल्या. 

प्रश्न: मुंडे-महाजनांचं नेतृत्व जे होतं ते भाजपमधील तुमचे हितशत्रू संपविण्यात यशस्वी ठरले आहेत का? एकीकडे पंकजा मुंडेंचे पंख कापण्यात आले तर दुसरीकडे तुमचं तिकीट कापण्यात आलं. 

पूनम महाजन: मी हितशत्रू कोणाला बोलत नाही.. मी हितप्रेमी बोलते सगळ्यांना.. शत्रू हा शब्द वापरणं चुकीचं आहे. नाही नाही.. ते असे कसे यशस्वी ठरतील.

महाजन हे महाराष्ट्रात एवढं लक्ष द्यायचे नाहीत. फक्त मुंडे असायचे आणि महाजन यांचं हेलिकॉप्टर पेरेंटिंग व्हायचं त्यांचं दिल्लीहून. कारण पूर्ण देश पाहायचा होता प्रमोदजींना... 

हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana : भाऊबीज झाली, लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत? 'असं' चेक करा तुमचं स्टेटस

मला वाटतं दोनच लोकांनी महाराष्ट्राचा प्रवास डिटेलमध्ये केला आहे. एक प्रमोद महाजन आणि दुसरे शरद पवार.. या दोन लोकांनी महाराष्ट्राला आतून-बाहेरून बघितलंय. मी स्वत: कधी एवढा प्रवास नाही केला. म्हणजे आजही मी काही तालुक्यात जाऊन आले.. तर तेव्हा समजलं की, मी इथे जाऊनच आले नव्हते.  

त्यामुळे मी शत्रू कोणालाच मानत नाही.. सगळे हितप्रेमी असतात.. कधी जास्त प्रेम करतात, कधी कमी प्रेम करतात. प्रेमाची पातळी कमी-जास्त असते. आता ती कशी समजून घ्यायची ती समजून घ्या. 

पण.. कोणी कोणाला संपवू शकत नाही. मी स्वत:ला संपवू शकते नक्की, पण साहिलजींना मी थोडी संपवू शकते.. प्रत्येक गोष्ट माझ्यावर अवलंबून आहे. आता याचं काही मी फिलॉसॉफिकल उत्तर देत नाही तर खरं उत्तर देते. 

शेवटी हो.. अडथळे येतात.. चुका पण होत असतील.. त्यातून शिकून तरी तुम्ही सामर्थ्याने उभे असाल आणि काहीही न बोलता.. जसं महाभारतात अर्जुनाला सुद्धा लढताना श्रीकृष्णाने उपदेश दिले तेव्हाच अर्जुन लढला. अर्जुनाला कळत नव्हतं मी कसा लढू माझ्या हितप्रेमींबरोबर.. होतं ते.. 

माझा अर्जुनाच्या आयुष्यावर खूप विश्वास आहे आणि महाभारतात हे होतं. कृष्णरुपी भारतीय जनता पार्टी उभी असते आणि नेतृत्व उभं असतं. माझं दिल्लीत कधीही असा अनुभव मोदीजी किंवा अमितजींबरोबर नाही की, जिथे मला वाटलं की, माझी गरज नाही. 

आताही मी महाराष्ट्रातील निवडणुकीसंबंधी काही प्रस्ताव पाठवले.. त्यापैकी बरेच लागूही करण्यात आले त्याचंही मला बरं वाटतं. असंही पूनम महाजन यावेळी म्हणाल्या.

    follow whatsapp