महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला, यासाठी तुम्ही कुणाला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे यानी शरद पवार यांचं नाव घेतलं. 1978 ला जर त्यांनी ही सुरूवात केली नसती, तर पुढे हे सगळं झालंच नसतं असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा ते राष्ट्रवादीत जाणार होते, मात्र ऐनवेळी शरद पवार यांनी हात वर केल्यामुळे ते काँग्रेसमध्ये गेलेत असं राज ठाकरे यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या एका मुलाखतीत बोलत असताना राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोदी आणि अमित शाह सांगत होते की पुढचा मुख्यमंत्री कोण आहेत, तेव्हा तुम्ही आक्षेप का नाही घेतला, गप्प का बसलात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनाही केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Vidhan Sabha Survey Report : पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा महायुती सरकारवर नाराज? महाराष्ट्राचा मूड काय?
1978, 1992 आणि नारायण राणे यांच्यावेळेला शरद पवार यांनी जे केलं, हे तीनवेळा झालं आणि पुढे ती सवय लागत गेली आणि सगळे निगरगठ्ठ झाले. यावेळी उमेदवारांनी तिकीटासाठी पक्ष बदलले. यांची हिंमत कशी होते? लोक नोकर आहेत का यांचे? लोकांनी उन्हात उभं राहून मतदान करायचं आणि नंतर या लोकांनी कोट्यवधी रुपये घेऊन दुसऱ्या पक्षात जायचं. या सर्व फुटकळ लोकांमुळे महाराष्ट्र ओरबाडला जातोय असं म्हणत राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केली.
हे ही वाचा >>
राज ठाकरे यांनी यावेळी अजित पवार यांचं कौतुक केलं. अजित पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, अजित पवार यांचं राजकारण काहीही असो त्यांनी कधी जातपात पाहिली नाही. त्यामुळे एकीकडे शरद पवार यांच्यावर टीका करताना राज ठाकरे यांनी दुसरीकडे अजित पवार यांचं कौतुक केल्यानं अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
ADVERTISEMENT