मुंबई: दलाल स्ट्रीटचे बिग बुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचं आज सकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. दोन आठवड्यांपूर्वीच राकेश झुनझुनवाला यांना रुग्णालयातून घरी सोडले होते. प्रकृती बिघडल्यानं त्यांना आज पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ADVERTISEMENT
राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक गुंतवणूकदारांना आकर्षित केले. मोटिवेशनल स्पिकर म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यांच्याकडे पाहून अनेक जणांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती. झुनझुनवाला यांची भारताबद्दलची दूरदृष्टी कायम स्मरणात राहील. भारतातील अनेक गुंतवणूकदारांना पुढे जाण्यासाठी ते कायम मार्गदर्शन म्हणून स्मरणात राहतील.
राकेश झुनझुनवालांचे 11 वन-लाइनर्स
1. शेअर मार्केट कायम महिलांसारखे असते. नेहमी कमांडिंग, रहस्यमय, अंदाज न बांधता येणारं आणि अस्थिर.
2. नेहमीस लाटेच्या विरुद्ध दिशेला जा. जेव्हा इतर शेअर विकत असतील तेव्हा खरेदी करा आणि जेव्हा इतर खरेदी करत असतील तेव्हा विक्री करा.
3. शेअर मार्केट नेहमी बरोबर असते. मार्केटला कधीच वेळ देऊ नका. माझा एकच नियम आहे की कोणताही नियम नाही.
4. जेव्हा विनाश आणि अंधकार असतो तेव्हा हे विसरु नका की पहाटेच्या आधी अंधार असतो.
5. शेअर मार्केट व्यक्तींवर अवलंबून असते. बाजार तर्कसंगत आहे. एखादी व्यक्ती शेअर मार्केटपेक्षा कधीच हुशार असू शकत नाही.
6. कधीही अवास्तव मुल्यांकनात गुंतवणूक करू नका. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या कंपन्यांच्या पाठिमागे कधीही धावू नका.
7. नेहमी किंमतीचा आदर करा. प्रत्येक किंमतीवर, एक खरेदीदार आणि एक विक्रेता असतो. कोण बरोबर आहे हे फक्त भविष्य ठरवते. तुमची चूक होऊ शकते त्याचा आदर करायला शिका.
8. शेअरचा सर्वात सुंदर भाग म्हणजे तो स्वस्त असावा .
9. चुका करा. एक चूक करा जी तुम्हाला परवडेल जेणेकरून तुम्ही चूक करण्यासाठी तयार होता. पण तीच चूक पुन्हा पुन्हा करू नका.
10. तुम्ही ज्यावेळी बरोबर गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही किती पैसे कमवले आणि तुम्ही चुकीचे असताना किती गमावले हे महत्त्वाचे आहे.
11. शेअर मार्केट जोखमीने भरलेले आहेत. जोखीम हे जीवनाचे सार आहे. जर तुम्ही धोका पत्करला नाही तर तुम्ही काहीच नाही.
ADVERTISEMENT