महाविकास आघाडी सरकारमधले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्यातील ११ जणांना कोरोना झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आता त्यांच्या ताफ्यातील ११ जणांना कोरोना झाला आहे. छगन भुजबळ हे एका लग्न सोहळ्यात गेले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाली, संपर्कात आलेल्या सगळ्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं होतं. आता छगन भुजबळ यांच्या ताफ्यातील ११ जणांना कोरोना झाला आहे.
ADVERTISEMENT
मागील वर्षापासून कोरोनाचा संसर्ग सुरु झाला आहे. जो अद्यापही कायम आहे. अशावेळी राज्य सरकारमधील 43 पैकी एकूण 26 मंत्र्यांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. सध्या कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना दुसरीकडे गेल्या आठवडाभरात राज्यातील 5 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. छगन भुजबळ यांच्यासह जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना देखील दुसर्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना बसला आहे. राष्ट्रवादीच्या 16 पैकी 13 मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर काँग्रेसचे 7, शिवसेनेचे 5 आणि एका अपक्ष मंत्र्यांला कोरोनाची लागण झाली आहे.
आता छगन भुजबळ यांच्या ताफ्यातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्यांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT