Omicron variant : ओमिक्रॉनचे रुग्ण वाढताच मुंबईत कलम 144 लागू! रॅली, आंदोलनांवर बंदी

सौरभ वक्तानिया

• 04:07 AM • 11 Dec 2021

ओमिक्रॉनचा संसर्गाचा वेग जास्त असल्याने आरोग्य यंत्रणांकडून खबरदारी घेतली जात असून, त्यातच शुक्रवारी मुंबईत 3 जणांना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचं समोर आलं. त्यामुळे मुंबईत कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज आणि उद्या (11 व 12 डिसेंबर) जमावबंदी लागू असणार आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गाचा धोका आणि वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबईत कलम 144 लागू […]

Mumbaitak
follow google news

ओमिक्रॉनचा संसर्गाचा वेग जास्त असल्याने आरोग्य यंत्रणांकडून खबरदारी घेतली जात असून, त्यातच शुक्रवारी मुंबईत 3 जणांना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचं समोर आलं. त्यामुळे मुंबईत कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज आणि उद्या (11 व 12 डिसेंबर) जमावबंदी लागू असणार आहे.

हे वाचलं का?

ओमिक्रॉनच्या संसर्गाचा धोका आणि वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईत जमावबंदी असणार असून, रॅली आणि आंदोलन करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मुंबईच्या पोलीस उपायुक्तांनी कलम 144 चे आदेश काढले आहेत.

ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हे आदेश लागू करण्यात आल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर भादंवि 188 आणि इतर कायद्यान्वये कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

मुंबईमुळे परदेशातून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्याने आतापर्यंत महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा व्हेरिएंटचा संसर्ग झालेले 17 रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी 7 नवीन रुग्ण आढळून आले. यातील तीन रुग्ण मुंबईतील असून, 4 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिक हद्दीततील आहेत.

मुंबईत आढळून आलेल्या रुग्णांचं वय 48, 25 आणि 37 वर्ष आहे. हे तिन्ही नागरिक टांझानिया, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतून आले आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील चौघांना नायजेरियन महिलेच्या संपर्कात आल्याने ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे.

एमआयएमची रॅली आणि भाजपची निदर्शने

मुंबईत जमावबंदी आदेश लागू करण्यामागे दोन राजकीय कार्यक्रमाचं कारण असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. एमआयएमच्यावतीने तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली असून, या रॅलीसाठी औरंगाबादहून कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे सुद्धा या रॅलीत सहभागी होणार आहेत. ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन पोलिसांनी रॅलीला परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारलेली असतानाही रॅली काढली जाणार आहे. मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी ही रॅली काढण्यात येणार आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या विधानांविरोधात भाजपच्या वतीने निदर्शनं केली जाणार आहेत. भाजपच्या वतीने मुंबईत विविध ठिकाणी निदर्शने केली जाणार असून, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हे आदेश लागू करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

    follow whatsapp