15 वर्षांच्या मुलाची क्रुरता; 9 वर्षीय मुलीवर अत्याचार करत गळा चिरुन हत्या

मुंबई तक

01 Dec 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 08:47 AM)

कल्याण : येथील अवघ्या १५ वर्षीय मुलाने ९ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची ब्लेडने गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एसटी आगरच्या लगत असलेल्या एका हायप्रोफाईल सोसायटीच्या आवारात ही घटना घडली. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये अत्याचार, हत्या आणि पोक्सो कायदा कलमांच्या आधारे गुन्हा दाखल करून संशयित अल्पवयीन […]

Mumbaitak
follow google news

कल्याण : येथील अवघ्या १५ वर्षीय मुलाने ९ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची ब्लेडने गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एसटी आगरच्या लगत असलेल्या एका हायप्रोफाईल सोसायटीच्या आवारात ही घटना घडली. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये अत्याचार, हत्या आणि पोक्सो कायदा कलमांच्या आधारे गुन्हा दाखल करून संशयित अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

याबाबत कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे कल्याण पश्चिम परिसरातील एसटी आगारच्या लगत असलेल्या एका हायप्रोफाईल सोसायटीच्या आवारात ९ वर्षीय मुलीचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी पंचनामा सुरु केला. तसंच अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.

Crime : कॅमेरा सुरु असतानाच तिच्याजवळ आले अन्…’; कोरियन तरुणीसोबत मुंबईत धक्कादायक घटना

तपासादरम्यान, परिसरातील CCTV फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या तासाभरात संशयित अल्पवयीन आरोपीची ओळख पटवली आणि त्याला स्टेशन परिसरातून ताब्यात घेतलं.

Parbhani Crime : गाढ झोपलेल्या पत्नीचं मुंडकं छाटलं, शिर हातात घेऊन पती गावभर फिरला!

चौकशीदरम्यान संशयित अल्पवयीन आरोपीने अत्याचार आणि हत्या केल्याची कबुली दिली. संबंधित मुलीच्या वडिलांनी आपल्याला काही दिवसांपूर्वी मारहाण केली होती. त्यामुळे त्यांच्या मुलीवर अत्याचार करत, ब्लेडने गळा चिरून हत्या केल्याचं, संशयिताने सांगितलं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक होनमाने पुढील तपास करत आहेत.

    follow whatsapp