सध्या राज्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढतेय. अशा परिस्थितीत बेड्स तसंच ऑक्सिजनचाही तुटवडा भासतोय. तर नागपूरमध्ये रेमडेसिविर आणि व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्यासाठी एका महिलेची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
नागपूरमध्ये राहणाऱ्या जयश्री नंदनवार यांच्या सासूची परिस्थिती नाजूक होती. त्यांच्यासाठी रेमडेसिविर आणि व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्याबाबत 2 आऱोपींनी जयश्री यांनी 1.60 लाखांची फसवणूक केली आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षाच येताच त्यांनी शक्करधारा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी आऱोपींनी अटक केली आहे. या आरोपींनी महिलेला रूग्णालयाचे पीआरओ असल्याचं सांगितलं होतं.
शक्करधारा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांनी सांगितले की, नागपूरच्या निवासी जयश्री नंदनवार खापरखेडा विद्युत विभागात अभियंता आहेत. त्यांचे पती बँकेत मॅनेजर आहेत. त्यांच्या सासूची कोरोनामुळे परिस्थिती नाजूक होती. अशातच जयश्री यांची निखिल यांच्याशी भेट झाली. निखिलने जयश्रीला दुसर्या खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि रेमेडिसिविर इंजेक्शन देण्याचं आश्वासन दिलं होतं.
आरोपीने स्वत: वैद्यकीय पीआरओ असल्याचा दावा करून जयश्री यांना खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड्स आणि रेमेडिसिविरसाठी निखिलच्या बँक खात्यात 1.60लाख जमा करण्यास सांगितले. जयश्री यांनी पैसे जमा केले. मात्र अशा परिस्थितीत त्यांच्या सासूचं निधन झालं. यानंतर जयश्री यांनी निखिलला पैसे परत मागितल्यावर तो टाळाटाळ करू लागला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.
ADVERTISEMENT